मुंबई

कांदाप्रश्नावर लवकरच निघणार तोडगा; अमित शाह यांनी बोलावलेली बैठक संपली

सकाळ वृत्तसेवा

कांद्याबाबत संसदेत झालेली चर्चा आपण सर्वांनीच पाहिली. त्यानंतर निर्मला सितारमण यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांना सर्व समाज माध्यमांवर त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं.

अशातच कांद्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची महिती समोर येतेय. सरकारंच शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीची शक्यता वर्तवली जातेय. सध्या कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. हे दर नियंत्रित करण्यासाठी सरकारकडून पावलं उचलणार असल्याचं बोललं जातंय. 

देशभरात कांदा सर्वसामान्यांना रडवतोय. कांद्याचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिगटाची बैठक बोलावली होती. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि नरेंद्रसिंह तोमर हे देखील उपस्थित होते.

कांद्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. कांद्यांनं इतका उच्चांकी दर गाठलाय की कांद्याच्या दरापुढे फळांचे दर कमी वाटू लागलेत. घाऊक बाजारात कांदा 130 रुपये किलो तर किरकोळ बाजारात कांदा 170 रुपये किलो झालाय. घाऊक बाजारातील कांद्याची आवक पुन्हा घटण्यास सुरुवात झालीय. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसू लागलाय. एकीकडे कांदा 100 पार गेलाय तर दुसरीकडे फळांची किंमत 40 ते 52 रुपये आहे.

WebTitle : meeting called by amit shah related to onion price hike is over

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage : कोयना धरण 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! आजच गाठणार टप्पा? महाबळेश्वर, नवजात पाऊस मंदावला; पाहा ताजी आकडेवारी

AUS vs BAN 2nd Test: जोश हेझलवूड झेल घ्यायला पळाला, बांगलादेशचा फलंदाज आडवा आला; Live मॅचमध्ये तुफान राडा Video Viral

Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'साठी पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणीसाठी अधिकारी आले, तर तीव्र प्रतिकार करू; राजू शेट्टींचा थेट इशारा, सांगलीत शक्तिपीठविरोधी मोर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात काँग्रेसच्या गुंडगिरीचा आरोप; विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी धमकावल्याचा राम सातपुतेंचा दावा

Maharashtra Politics : 2014 मध्येच वेगळा निर्णय घेणार होते? उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या 'त्या' इच्छेवर योगेश कदमांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT