महिलांचं WhatsApp स्टेटस पाहणाऱ्यांनो सावधान, पोलिस ठोकतील तुम्हाला बेड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी एक सावधानतेचा इशारा. कारण महिलांचं व्हॉट्सऍप किंवा फेसबुक स्टेटस सतत पाहात असाल तर तुम्हाला जेलवारी घडू शकते. का घडेल जेलवारी. जाणून घ्या.

सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी एक सावधानतेचा इशारा. कारण महिलांचं व्हॉट्सऍप किंवा फेसबुक स्टेटस सतत पाहात असाल तर तुम्हाला जेलवारी घडू शकते. का घडेल जेलवारी. जाणून घ्या.
 

  • महिलांचं व्हॉट्सअॅप स्टेटस सतत पाहताय?

  • पोलिस ठोकतील तुम्हाला बेड्या

  • विनयभंगाच्या आरोपाखाली जावं लागेल तुरुंगात

 

हेही वाचाहजाराची नोट येणार, दोन हजारांची जाणार ?
 

तुम्हाला महिलांची व्हॉट्सऍप, फेसबुक स्टेट्स पाहायला आवडतात? पण आता जरा सांभाळून. कारण एखाद्या महिलेचं व्हॉट्सऍप किंवा फेसबुक स्टेट्स सतत पाहात असाल तर जेलची हवा खावी लागेल. तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.  

एखाद्या महिलेनं किंवा मुलीनं तिचं व्हॉट्सऍप स्टेटस बदललं की तातडीनं ते पाहायची तुमची खोड असेल तर ती तुम्ही सोडून देणंच उत्तम. एखाद्या महिलेचं तातडीनं स्टेटस पाहणं म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखं आहे. हा भारतीय दंड विधान 354 ड नुसार गंभीर गुन्हा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेवर चोरून नजर ठेवली तर पहिल्या गुन्ह्यासाठी 3 वर्षे जेल आणि दंड तर दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास 5 वर्षे कारावास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे

महत्त्वाची बातमी :  दर अडीच मिनिटाला धावणार एक लोकल? हार्बर प्रवाशांना मिळणार का खुशखबर?

महिला सहसा अशा गुन्ह्यांच्या तक्रारी करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढतं. त्यामुळे महिलांनी या नराधमांना धडा शिकवण्यासाठी पुढे आल्यास या गुन्हेगारांना जरब तर बसेलच पण भविष्यातले गुन्हेही टळतील, हे नक्की.

WebTitle : keeping watch on females whastapp status might take you to the jail


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: keeping watch on females whastapp status might take you to the jail