MLA vishwanath bhoir in press conference maharashtra political news esakal
मुंबई

''आजही मी शिवसेनेत; पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच, शिंदे हे आमचे नेते''

रविंद्र खरात

कल्याण (जि. ठाणे) : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सोबत बंडाळी केली असून शिवसेनेशी (Shivs sena) नाही , आज ही मी शिवसेनेत असून माझ्यासाठी मातोश्री मंदिर असून आमचे नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) असून उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे पक्ष प्रमुख आहेत असे प्रतिपादन शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत केले. (MLA vishwanath Bhoir statement about shivsena uddhav thackeray mumbai Latest maharashtra political news)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते .विकास कामे करताना अनेक अडचणी निर्माण होत होते , हॉस्पिटल पासून अनेक विकास कामे शासनाकडे घेऊन गेलो मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडे ते मंत्री पद असल्याने ठप्प झाल्याची व्यथा भोईर यांनी व्यक्त केली ...

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर कोरोना नंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजार पण यामुळे त्यांच्याशी भेट नाही मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते त्यामुळे माझ्या विधानसभा मतदार संघात कामे झाल्याची मत यावेळी भोईर यांनी व्यक्त केले .

अडीच वर्षात कामे झाली नसतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्याने आगामी अडीच वर्षात विकास कामे होतील असा दावा आमदार विश्व नाथ भोईर यांनी केला ...

शिवसेनेतच आहे ...

आम्ही बंडाळी शिवसेनेशी नव्हे महाविकास आघाडीशी केली असून आज ही मातोश्री माझ्या साठी मंदिर असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असून आमचे नेते एकनाथ शिंदे असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले .

विविध पोस्टर कार्यकर्ते बनवत असून ज्यांना अडचण असेल तर यापुढे त्यांचे फोटो लावणार नसल्याची टीका शिवसेना कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांचे नाव न घेता टोला लगावला .

नवी मुंबई विमानतळ दि बा पाटील यांच्या नावाला स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हे पत्रकाराकडून समजत असून याबाबत माहिती नसून असे असेल तर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करेल असे यावेळी भोईर यांनी स्पष्ट केले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT