panther Attack sakal media
मुंबई

‘आरे’त पुन्हा बिबट्याचा हल्ला , तरुण जखमी; आठवड्यातील तिसरी घटना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे दुग्ध वसाहतीजवळ (Aare society) बिबट्याने (panther attack) आणखी एका तरुणावर गुरुवारी (ता. ३०) रात्री प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात राजेश रावत (rajesh rawat) (वय १९) हा तरुण जखमी झाला आहे. या आठवड्यातील हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वीच्या बिबट्याच्या हल्ल्यात एक ज्येष्ठ महिला व लहान मूल जखमी झाले होते.

आरे वसाहतीजवळील युनिट क्रमांक ७ मध्ये राजेश रावत हा तरुण आपल्या एका मित्राला घरी सोडायला गेला होता. त्यानंतर घराकडे परतत असताना चित्रनगरी रोड, पंजाब ढाबा, सुनील मैदान येथे रात्री नऊच्या दरम्यान बिबट्याने राजेशवर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून हात, पाय आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. जखमी राजेशला ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चित्रनगरीतील संपूर्ण परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. हा परिसर गर्द झाडीने व्यापलेला असल्याने तेथील रस्त्यावरून प्रवास करताना अनेक वेळा बिबट्ये दिसतात. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची चांगलीच दहशत आहे. महिनाभरात बिबट्याने चार जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT