esakal | आठ लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या नोकराला अटक | Mumbai crime
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested

आठ लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या नोकराला अटक

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

अंधेरी : सुमारे आठ लाख रुपयांची रोकड घेऊन पळून गेलेल्या नोकराला पवई पोलिसांनी (Powai police) अटक केली. महावीर सुरेश शिरवाळे (suresh shirwale) असे या आरोपी नोकराचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने (Andheri court) पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून आठपैकी चार लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा पवई परिसरात मनी एक्सचेंजचा व्यवसाय आहे.

हेही वाचा: महिला सबलीकरणासाठी 'वूमन कनेक्ट चॅलेंज'

त्यांच्याकडे महावीर हा गेल्या पाच वर्षांपासून कामावर होता. कार्यालयात जमा होणारी लाखो रुपयांची रक्कम महावीर हा बँकेत जमा करीत होता. त्याच्यावर तक्रारदार व्यावसायिकांचा विश्‍वास होता. गेल्या आठवड्यात त्यांनी आठ लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले होते. मात्र ही रक्कम बँकेत जमा न करता तो पळून गेला होता.
गुन्हा केल्यानंतर महावीर हा धुळे आणि नंतर पुण्यात गेला होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पवई पोलिसांचे दोन विशेष पथक पाठविण्यात आली होती. या पथकाने पुण्यातून महावीरला अटक केली.

loading image
go to top