Mumbai Ahamdabad Bullet Train : sakal
मुंबई

Mumbai Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरुंग स्फोटांमुळे आदिवासी वस्तीला धोका

सकाळ डिजिटल टीम

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील जलसार गावातील डोंगरातून दगड आणि मातीसाठी उत्खनन केले जाते. या सुरुंग स्फोटांमुळे डोंगराच्या पलीकडील टेंभीखोडावे गावातील आदिवासी पाड्याच्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे. विनापरवाना सुरुंग स्फोट करून सुरू असलेले उत्खनन बंद करण्याची मागणी आदिवासी समाजोन्नती संस्थेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.

जलसार गावातील घानवड डोंगरातून काही दिवसांपासून बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कंत्राटदाराकडून मातीचे उत्खनन करून वाहतूक केली जाते. डोंगरातून दगड आणि माती काढण्यासाठी सुरुंग स्फोट केले जातात.

डोंगराच्या पाठीमागच्या बाजूस टेंभीखोडावे ग्रामपंचायतीतील भाटीचा पाडा वसलेला आहे. या पाड्यात सर्व आदिवासी लोकवस्ती असून पाडा डोंगर पायउतारावर वसलेला आहे. डोंगरातून दगड-माती काढण्यासाठीच्या स्फोटांतून उडणारे दगड भाटीच्या पाड्यातील लोकवस्तीत पडून जीवितहानी होण्याची शक्यता असून राहत्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त ग्रामस्थांनी व्यक्त केली.

मंडळ अधिकाऱ्यांकडून पाहणी
सुरुंग स्फोटांविरोधात आदिवासी समाजोन्नती संस्थेने तहसीलदार कार्यालयात केलेल्या तक्रारीनंतर बुधवारी (ता. १४) मंडळ अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन पाहणी केली. मंडळ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही उत्खनन आणि वाहतूक सुरूच असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

खाणीच्या तोंडावर जलसार ग्रामपंचायतीचे दारशेत पाडा आणि किरईपाडा वसलेला आहे. भाटीच्या पाड्याप्रमाणे सुरुंग स्फोटांचा धोका निर्माण झाला आहे. सुरुंग स्फोट आणि दगड-माती उत्खननाला विरोध केला जाणार आहे.
- सागर सुतार, अध्यक्ष, आदिवासी समाजोन्नती संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

Pune Crime: दूध भेसळप्रकरणी पोलिसांचा धडाका; आणखी १० आरोपी अटकेत, एकूण २४ जणांना बेड्या

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT