Mumbai Ahamdabad Bullet Train :
Mumbai Ahamdabad Bullet Train :sakal

Mumbai Ahamdabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे पहिले स्थानक झाले तयार

Mumbai Ahamdabad Bullet Train : सुरत स्थानकाचे प्राथमिक स्थापत्य पूर्ण

Mumbai Ahamdabad Bullet Train : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून महाराष्ट्रातील कामाच्या सर्व पॅकेजच्या कामांसाठी १०० टक्के निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुजरातमधील कामेही वेगात सुरु असून मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिल्या स्थानकाने आकार घेतला आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर २८ कॉन्ट्रॅक्ट पॅकेजेसमध्ये विभागला गेला आहे. ज्यापैकी ११ सिव्हिल पॅकेजेस आहेत, ३३ महिन्यांच्या कालावधीसाठी करार करण्यात आला आहे. गुजरात राज्यातील चार हायस्पीड रेल्वे स्थानक (वापी, बिलीमोरा, सुरत आणि भरूच) आणि सुरत रोलिंग स्टॉक डेपोसह २३७ किमी.

Mumbai Ahamdabad Bullet Train :
Maharastra Politics : अजितदादांमुळे अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलेल

वायडक्टच्या बांधकामासाठी पहिला सिविल करार २८ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आला, जो भारतातील सर्वात मोठा नागरी करार देखील होता. महाराष्ट्र राज्यातील तीन हायस्पीड रेल्वे स्थानकांसह (ठाणे, विरार आणि बोईसर) १३५ किमी लांब. वायडक्टसाठी अंतिम सिविल करार १९ जुलै २०२३ रोजी करण्यात आला.

Mumbai Ahamdabad Bullet Train :
Aaple Sarkar Portal : आता क्रमानुसार मिळणार दाखले; ‘आपले सरकार’ पोर्टलवरून करा ऑनलाईन अर्ज

गुजरात राज्यातील वापी, बिलीमोरा, सुरत आणि भरूच या चार स्थानकांपैकी सुरत स्थानकांची स्थापत्य उभारणी आता प्रगतीपथावर आहे. स्थापत्य काम पूर्ण होऊन आकार घेणारे सुरत हे या मार्गातील पहिले स्थानक ठरले आहे. या स्थानकाचे कॉन्कोर्स आणि रेल्वे लेव्हल स्लॅब पूर्ण झाले आहेत. स्टेशनचा ४५० मीटर लांब कॉन्कोर्स आणि ४५० मीटर लांबीचा रेल्वे लेव्हल पूर्ण झाला आहे.

या स्थानकासाठीचा पहिला स्लॅब २२ ऑगस्ट २०२२ रोजी टाकण्यात आला आणि शेवटचा स्लॅब २१ ऑगस्ट २०२३ रोजी टाकण्यात आला. म्हणजेच, एका वर्षाच्या कालावधीत दोन्ही कॉनकोर्स आणि रेल्वे स्तरावरील स्लॅब पूर्ण झाले. या स्थानकाचे अंतरंग हिऱ्याच्या आकाराची प्रतिकृती रुपात साकारले जाणार आहे.

असे असेल बुलेट ट्रेनचे स्थानक

Mumbai Ahamdabad Bullet Train :
sakal Podcast : केंद्राचा मुंबई गिळंकृत करण्याचा डाव ते नागरिकांवर सरकारची पाळत

प्लॅटफॉर्म लेव्हल

- ४ फ्लॅटफॉर्म

कोनकोर्स लेव्हल

-प्रतीक्षा कक्ष आणि व्यापार कक्ष

- स्वच्छतागृहे

-नर्सरी

-दुकाने आणि कियोस्क

-तिकीट काऊंटर आणि नागरी सुविधा कक्ष

तळमजला

-वाहनतळ

-पिकअप आणि ड्रॉप (कार, बस, ऑटो)

-पादचारी मार्ग

-सुरक्षा आणि तपासणी कक्ष

-लिफ्ट, एस्किलेटर आणि ट्रॅव्हलेटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com