मुंबई

Ambarnath: अंबरनाथमध्ये बोगस महिला आमदार! पिस्टल परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने उकळले लाखो रुपये

पिस्टल आणि परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली एका बोगस महिला आमदाराने एकाची साडेपाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे.

Manoj Bhalerao, सकाळ डिजिटल टीम

Bogus MLA Fraud Ambernath: पिस्टल आणि परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली एका बोगस महिला आमदाराने एकाची साडेपाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. या फसवणूकप्रकरणी संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वंदना मिश्रा असे तिचे नाव असून तिचे सहकारी अभिषेक आणि फिरोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभेची आमदार असल्याचे स्टीकर वाहनावर लावून वंदना मिश्रा आणि तिच्या सहकाऱ्यांनी एक जणाची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. अंबरनाथ पश्‍चिम येथील रहिवासी अनमोल सिंह यांनी मिश्रा हिच्याकडे वाहन परवान्याबाबत विचारणा केली होती. त्यावर मिश्रा हिने अभिषेक आणि फिरोज हे दोघे आपले स्वीय सहायक असल्याचे त्यांना सांगितले.

सिंह यांनी फेब्रुवारी ते जून २०२३ या काळात मिश्रा हिच्या बँक खात्यात ५ लाख २० हजार रुपये जमा केले; मात्र पैसे देऊनही पिस्टल परवाना न मिळाल्याने सिंह यांनी विचारणा केली, तेव्हा त्यांना मिश्रा हिच्याकडून धमकावण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच सिंह यांनी अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार दुप्पट होणार की फक्त ३१ % वाढ ? जाणून घ्या फिटमेंट फॅक्टरचं संपूर्ण गणित

Uddhav Thackeray : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Selu Traveler Accident: ट्रॅव्हलरची टिप्परला मागून धडक; गुजरात येथील १७ प्रवासी जखमी; रमणा फाट्याजवळ अपघात

तापसीच्या एका वक्तव्याने कंगना भडकली? ‘सस्ती कॉपी’ म्हणत पुन्हा तापसीला डिवचलं! नंतर पोस्ट केली डिलीट

Crime: रस्त्याकडेला उभं राहून नागरिकांवर नको त्या कमेंट्स, जाब विचारताच मोठा वाद; तरुणांच्या हाणामारीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT