Pesticides : बटाटा, सोयाबीनवरील कीटकनाशके घातक! कार्बोफ्युरेन, ट्रबुट्रेनवर मराठी शास्त्रज्ञांचे संशोधन

डॉ. शकुंतला सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा येथील डीबीएनपी महाविद्यालयाचे डॉ. मल्हारी नागटिळक यांच्या चमूने हे संशोधन केले आहे.
Pesticides
PesticideseSakal

बटाटा, सोयाबीन आणि मका या पिकांवर वापरण्यात येणारे ‘कार्बोफ्युरेन’ हे कीटकनाशक आणि ‘ट्रबुट्रेन’ हे तणनाशक मानवी शरिरासाठी घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. मराठी संशोधकांनी प्रयोगशाळेत डॉकींग सिम्युलेशनच्या आधारे मानवी प्रथिनांसोबतची त्याची अभिक्रिया उलगडली आहे. हे संशोधन एल्सवेअरच्या ‘जर्नल ऑफ मॉलिक्यूलर स्ट्रक्चर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

डॉ. शकुंतला सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा येथील डीबीएनपी महाविद्यालयाचे डॉ. मल्हारी नागटिळक यांच्या चमूने हे संशोधन केले आहे. शेतीत वापरात येणारी औषधे मानवी शरीरास घातक असल्याची चर्चा नेहमी होते, पण संशोधनाचा काहीसा अभाव दिसतो. नेमकी हीच गरज ओळखून या चमूने किटक आणि तणनाशकांची मानवी रक्ताबरोबरील अभिक्रिया तपासायचे ठरविले. त्यातूनच काही संयुगांचे रक्तातील ‘अल्ब्युमीन’सोबतचे वर्तन डॉकींग सिम्युलेशनच्या माध्यमातून तपासण्यात आले. यामध्ये अल्फाक्लोरोलोस आणि बेंडीओकर्ब या कीटकनाशकांचाही समावेश आहे.

डॉ. नागटिळक यांना डॉ. रंजना जाधव, डॉ. चंद्रकांत खिलारे, डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्राचे संशोधन डॉ. सतीश पवार, प्रा. संदीप लबडे, डॉ. किरण लोखंडे, डॉ. संदीप सोनटक्के यांचे संशोधनात साहाय्य लाभले.

Pesticides
Cancer Medicine : गोगलगाईच्या श्र्लेष्मात सापडलं चक्क कर्करोगाचे औषध, जुन्नरच्या महाविद्यालयाचे संशोधन; ‘NCL’ चाही सहभाग

असे झाले संशोधन

सर्सापणे वापरात येणारी कार्बोफ्युरेन आणि ट्रबुट्रेन या रासायनिक संयुगांची निवड

मानवी रक्तातील विद्राव्य प्रथिने अर्थात अल्ब्युमीन सोबतची त्यांची अभिक्रिया तपासण्यात आली

यासाठी संगणक आधारित डॉकिंग सिम्युलेशनचा वापर करण्यात आला

निष्कर्ष

कार्बोफ्युरेन आणि ट्रबुट्रेन रक्तातील विद्राव्य प्रथिनांशी बंध तयार करतात

त्यामुळे मानवी शरिरात जास्त काळ ही रसायने टिकतात

पर्यायाने त्यांच्यापासून होणारे दुष्परिणामांची तीव्रता वाढते

कार्बोफ्युरेनचे दुष्परिणाम

मानवी ह्रदय, किडनी, यकृत आणि मेंदूवर थेट हल्ला करते

अतिवापराने हृदय व रक्तवाहिन्या यासंबंधीचे आजार वाढतात

जीवनशैलीशी संबंधित मधुमेह, दमा, आदी आजार वाढतात

पाण्यामध्ये सहज विरघळत असल्याने भूजलामध्ये उतरते

जनुकीय विकारांनाही कारणीभूत होऊ शकते

Pesticides
Tea Side Effects : दूधाचा चहा तुमच्या जीवावर उठलाय; वेळीच चहाचं व्यसन सोडा, वाचा काय म्हणतो रिसर्च

उपाययोजना

कृषी औषधांमध्ये या दोन्ही संयुगांचा वापर टाळायला हवा

पर्यायी औषधांसह उपचारावरही संशोधन करण्याची गरज

औषधांच्या वापरासंबंधी शेतकऱ्यांची जनजागृती गरजेची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com