corona sakal media
मुंबई

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत; १२ वर्षांखालील चार मुलांचा समावेश

15 मुलांसह 22 जणांना बाधा

समीर सुर्वे

मुंबई : मुंबई सेंट्रल (mumbai central) आग्रीपाडा येथील अनाथाश्रमातील (orphanage) 16 मुलांसह 22 जणांना कोविडची बाधा (corona infection) झाली असल्याचे आढळले आहे. यात,12 वर्षाखालील चार मुलांचा (children) समावेश असून त्यांना नायर रुग्णालयात (nair hospital) दाखल करण्यात आले आहे.तर,11 मुले आणि 7 कर्मचाऱ्यांना भायखळा येथील कोविड केंद्रात (byculla corona center) दाखल करण्यात आले आहे. माहिती महानगरपालिकेकडून (bmc) देण्यात आली.

आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ बोरडिग स्कुल आणि अनाथ आश्रमातील दोन मुलांना कोविडची बाधा झाल्याचे आढळले होते.त्यानंतर महानगर पालिकेच्या ई विभागाने या अनाथ आश्रमात चाचणी शिबीर राबवले.यात कर्मचाऱ्यांसह 95 जणांची चाचणी करण्यात आली.यातील 22 मुलांना कोविडची बाधा असल्याचे आढळले.त्यात 4 बालकांचा समावेश असून त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर,उर्वरीत मुलांना जंम्बो कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

दोन मुलांना कोविडची बाधा असल्याचे आढळल्या नंतर सर्वाची तपासणी करण्यात आली होती.त्यात,हे रुग्ण आढळले आहेत.या सर्वांवर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थीर आहे.तसेच,इतरांचे आश्रमातच विलगीकरण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा प्रभाव लहान मुलांवर फारसा पडला नाही.मात्र,तीसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.आता पर्यंत मुंबईत एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधीत अाढळली नव्हती.

कांदिवलीतील इमारत सील

कांदिवली येथील वीणा संगीत या इमारतीत महिनाभरापासून १४ रुग्ण सापडले आहेत, तर आतापर्यंत आठ रुग्णांनी कोविडवर मात केली. उर्वरित सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालिकेने काही दिवसांपूर्वी ही इमारत सील केली आहे; मात्र गेल्या आठवडाभरात या इमारतीत नव्या रुग्णांची नोंद झाली नाही. तसेच या सर्व रुग्णांचे नमुने ‘डेल्टा व्हेरियंट’च्या तपासणीसाठी पाठवले होते; मात्र सर्व अहवाल नकारात्मक आले आहेत, असे पालिकेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT