Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime: मुंबई हादरली! चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार

रुपेश नामदास

मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही महिलांवरील गुन्ह्यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. महिल्यांवरील गंभीर तक्रारी सुद्धा विविध पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, मुंबई,मरीन ड्राईव्ह परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हरियाणावरून मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने मरीन ड्राईव्ह परिसरात बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या ३५ वर्षीय आरोपी मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. ते बुधवारी हरियाणातून चित्रपटाच्या शूटिंगसाठी एकत्र मुंबईत आले होते. रविवारी शूटिंग संपल्यानंतर १९ वर्षीय तरुणी आणि तिचा ३८ वर्षीय सहकारी मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने मित्राने रात्री तिच्या रुमची बेल वाजवली. दार उघडताच त्याने रुममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला असता, तिला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्रभर तो तिच्यावर बलात्कार करत राहिला.

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिच्या ३५ वर्षीय आरोपा मित्राला अटक केली असून त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

SCROLL FOR NEXT