mumbai crime police marathi news Sakal
मुंबई

Mumbai Crime: बेकायदेशीर बांगलादेशीला मुंबईत अटक!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: खारघर परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकाला शनिवारी (ता. ११) खारघर पोलिसांनी अटक केली. गौस हक्कामिया शेख (३१) असे त्याचे नाव असून तो मागील अनेक वर्षांपासून खारघरमध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याचे चौकशीत आढळून आले.

खारघर सेक्टर-३४ मधील मॅजिस्टेट व्हिला इमारतीत बांग्लादेशी नागरिक विनापासपोर्टशिवाय राहत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गस्तीवर असलेले पोलिस हवालदार संजय मोरे व पोलिस शिपाई माच्छिंद्र पाटील यांनी शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मॅजिस्टेट व्हिला इमारतीत गौस हक्कामिया शेख हा बांग्लादेशी नागरिक विनापासपोर्ट तसेच वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने बांग्लादेशातील दारिद्र्याला कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे कबुल केले. तसेच तो खारघरमध्ये मागील अनेक वर्षांपासून बेकायदा वास्तव्यास असल्याचेही कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी शेख याच्या विरोधात पारपत्र अधिनियम तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT