Mumbai Crime youth beat doctor holi alcohol police sakal
मुंबई

Mumbai Crime News : मलमपट्टी करुन घेण्याऐवजी डॉक्टरला मारहाण...

कल्याणमध्ये घडला प्रकार

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - धुळवड साजरी करताना पायाला दुखापत झाल्याने अटाळी गावातील एक तरुण डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला. मलमपट्टी करण्यासाठी आलेला तरुण हा मद्यपान करुन आल्याने डॉक्टरने त्याला दारू पिऊन आला का ?

असे विचारले. याचा राग आल्याने दोन तरुणांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला असून याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबिवली येथील अटाळी गावात मंगळवारी रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाच्या पायाला काच लागली.

पायाला काच लागल्याने पट्टी करण्यासाठी तरुण डॉ. नितीन प्रजापती यांच्या गुरुकृपा क्लिनिक मध्ये गेला. यावेळी तो तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची अवस्था पाहून हॉक्टरांनी त्याला दारु प्यायला आहे का ? असे विचारले. याचा राग तरुणाला आल्याने त्याने व त्याच्या मित्राने डॉक्टरशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली.

हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी तरुणां विरोधात डॉ. नितीन यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश पाटील व नंदकुमार पाटील अशी मारहाण करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करा अन्यथा आंबिवली परिसरातील क्लिनीक बंद ठेवण्याचा इशारा डॉक्टर संघटनांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT