Crime
Crime sakal

Crime News : अल्पवयीन मुलीची घरातच प्रसूती; अर्भकाचे शीर केले धडावेगळे

अल्पवयीन मुलीची घरातच प्रसूती करून बाळाच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांना जाऊ नये म्हणून अर्भकाचे शीर केले धडावेगळे.
Published on
Summary

अल्पवयीन मुलीची घरातच प्रसूती करून बाळाच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांना जाऊ नये म्हणून अर्भकाचे शीर केले धडावेगळे.

ढेबेवाडी - अल्पवयीन मुलीची घरातच प्रसूती करून बाळाच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांना जाऊ नये म्हणून अर्भकाचे शीर धडावेगळे करून डोंगराजवळ नाल्यात टाकून दिल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यात एका गावात घडली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करून याप्रकरणी संबंधित मुलीच्या वडिलांना अटक केली.

पोलिसांची माहिती अशी, संबंधित गावातील अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती एका खासगी दवाखान्यातून मिळाल्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून विविध कलमानुसार संशयितांवर गुन्हा दाखल केला होता.

पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड याप्रकरणी तपास करत असताना संशयित व अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, मुलीच्या पोटात गर्भ आढळून आला नाही. पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांनी पिढीत मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Crime
Satara Police : खासदार उदयनराजे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यात भडका; साताऱ्यात 'पेटिंग'वरून मोठा वाद

त्यानुसार संबंधित मुलीच्या वडिलांच्या मुसक्या आवळण्यात आल्या व डोंगराच्या जवळ नाल्यात टाकलेले मृत अर्भक ताब्यात घेण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक लावंड, दीप ज्योती पाटील, अभिजित चौधरी, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, पी. डी. चव्हाण, नवनाथ कुंभार, माणिक पाटील आदींनी या गुन्ह्याचा कौशल्याने तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com