Railway  esakal
मुंबई

Mumbai: मालगाडी चे डब्बे इंजिनापासून झाले वेगळे, नेरळ वे वांगणी लोहमार्गावर घडली घटना

घडल्या घटनेबाबत घटनास्थळी संबंधित कर्मचारी वर्ग गेला असून डबे लवकरच जोडण्यात येतील असे सांगण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

वांगणी - बुधवारी सकाळी 7.54 च्या दरम्यान मालगाडीचे डब्बे इंजिनापासून वेगळे झाल्याची घटना घडली आहे. कल्याण - कर्जत लोहमार्गावरील वांगणी ते नेरळ रेल्वे स्थानक दरम्यान ही घटना घडली असून याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे.

कर्जत मार्गावरील लोकसेवा ही उशिराने धावत आहे. रक्षाबंधन असल्याने चाकर मान्यांसह अन्य प्रवासी आज लोकलने प्रवास करीत आहेत. त्यात हा गोंधळ झाल्याने प्रवासी ताटकळत स्थानकांत उभे आहेत.

बुधवारी रक्षाबंधन असल्याने नागरिकांची सकाळी गैरसोय झाली आहे. कल्याण - कर्जत मार्गावर बदलापूर, नेरळ, वांगणी दरम्यान लोकसेवा धीम्या गतीने सुरू असून प्रवासी ताटकळले आहेत.

लवकरात लवकर समस्या सुटावी आणि प्रवास सूरु व्हावा अशी मागणी प्रवाशांनी केली. मंगळवारी देखील कल्याण मार्गावर फलाट 6 व 7 सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता, त्यामुळे समस्या झाली होती. सकाळी पहिल्या सत्रातच बिघाड होत असल्याने रेल्वे प्रवासी, चाकरमान्यांचे हाल होत आहेत. रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्यांना बसत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. कुटुंबासह निघालेल्या नागरिकांचे बुधवारच्या घटनेमुळे ठिकठिकाणी हाल झाले.

डबे पुन्हा जोडण्याचे काम करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. घडल्या घटनेबाबत घटनास्थळी संबंधित कर्मचारी वर्ग गेला असून डबे लवकरच जोडण्यात येतील असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT