ajit pawar in pune
ajit pawar in puneesakal

Ajit Pawar in Pune : पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, ''तुझ्या तोंडात साखर पडो''

पुणेः आगामी गणोशोत्सवाच्या अनुषंगाने पुण्यामध्ये पोलिस प्रशासनासोबत एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला पालकमंत्री बाजूलाच परंतु अजित पवारांचाच बोलबाला दिसला. बैठकीलाही त्यांनीच संबोधित केलं. बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

गणपती उत्सवामध्ये पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. सर्व मिरवणुका वेळेत काढण्यासाठी प्रयत्न असेल. गणेश मंडळांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आयुक्त श्रावण हार्डीकर यांना आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, ''तुम्ही पालकमंत्री असताना दर आठवड्याला बैठका घेत होतात चंद्रकांतदादा घेत नाहीत'' असा प्रश्न अजित पवारांना विचारल्यानंतर ते म्हणाले, मला वाटतं की माझ्या बैठकीचा परिणाम सात दिवस राहणार म्हणून पुन्हा मी पुन्हा बैठक घेतो. काहींना वाटतं आपल्या बैठकीचा परिणाम एक ते दोन महिने राहणार त्यामुळे ते तेवढ्या दिवसांच्या फरकाने बैठका घेतात.

ajit pawar in pune
Reliance AGM 2023: मुकेश अंबानींच्या रिलायन्सने रचला विक्रम, भरला एवढा टॅक्स

आजच्या बैठकीनंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत की अजित पवार? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावरुन पत्रकारांनी तुमच्याकडे सुपर पालकमंत्री म्हणून बघितलं जात आहे, असं विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले की, तुझ्या तोंडात साखर पडो!पालकमंत्रीपदावरुन कालही त्यांनी बीडमध्ये विधान केलं होतं. बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला होता.

ajit pawar in pune
RIL AGM 2023: एकीकडे रिलायन्स एजीएममध्ये अंबानींच्या मोठ्या घोषणा तर दुसरीकडे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण...

आज अजित पवार यांनी बीडमध्ये झालेल्या सभेचा उल्लेख केला. छगन भुजबळ यांनी केलेलं भाषण मला ऐकूच आलं नाही. मी ज्या ठिकाणी बसलो होतो तेथे आवाज ऐकू येत नव्हता. मला कार्यक्रमानंतर मोबाईलवर काही व्हिडीओ पाहण्यात आले. माझं स्पष्ट मत आहे की, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी काळजी नेत्यांनी घ्यायला हवी असं मला वाटतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com