pandharinath-phadke sakal
मुंबई

Pandhrinath Phadke : पंढरीनाथ फडके यांची अखेर तुरुंगातून सुटका, अंदाधुंद गोळीबार प्रकरणी ८ महिने भोगला कारावास

अंदाधुंद गोळीबार प्रकरणी ८ महिने भोगला कारावास कारागृहात

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : अंबरनाथ एमआयडीसी परिसरात बैलगाडा शर्यतीवरून वाद झाला होता. या वादातून पंढरीनाथ फडके यांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात असलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांची अखेर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

मोक्का कायद्यांतर्गत अटक झाल्यानंतर गेले आठ महिने फडके हे ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. मुंबई उच्च न्यायालयानं फडके यांची जामिनावर सुटका केली आहे. जामिनासाठी फडके यांच्याकडून 50 हजारांची हमी घेण्यात आली असून याचं उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्याचा इशारा न्यायालयानं दिला आहे.

पनवेल येथील पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून वाद झाले होते. याच वादातून नोव्हेंबर 2022 मध्ये अंबरनाथ एमआयडीसी परिसरात फडके गटाने राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. याप्रकरणी फडके यांच्यासह एकूण 32 जणांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. याप्रकरणी 8 महिने ठाणे मध्यवर्ती कारागृहात राहिल्यानंतर अखेर फडके यांची मुंबई उच्च न्यायालयानं जामिनावर सुटका केली.

जामिनासाठी फडके यांच्याकडून 50 हजारांची हमी घेण्यात आली असून याचं उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्याचा इशारा न्यायालयानं दिला आहे. तसंच पुढील 2 वर्ष दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी फडके यांना अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावावी लागणार आहे. दरम्यान, आता फडके बाहेर आल्यानंतर बैलगाडा शर्यतींना पुन्हा एकदा रंगत येणार असल्याची चर्चा बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 50,000 चे झाले तब्बल 7 लाख! 1320% रिटर्न देणाऱ्या शेअरची जोरदार चर्चा; 3 आठवड्यांत पैसा डबल

Vaibhav Sooryavanshi चा खेळ पाहण्यासाठी अजित आगरकर चेन्नईत पोहोचणार! KL Rahul ची माघार, हा सामना कुठे रंगणार, Live कुठे?

हिमालाय वितळण्याचं कारण मानवी मूत्र, दरवर्षी २५०० टन बर्फाचं होतंय पाणी; धक्कादायक माहिती समोर

Marathi News Live Updates: जेडब्ल्यू मॅरियट आणि शेराटन हॉटेलविरुद्ध पुणे पोलिसांची कारवाई

Teachers Day 2026: आयुष्यभराची २५ लाखांची कमाई मुलांच्या शिक्षणासाठी खर्चली; शिक्षकाने उभारली वंचितांसाठी शाळा!

SCROLL FOR NEXT