Mumbai Kalwa Bhaskar Nagar heavy rain
Mumbai Kalwa Bhaskar Nagar heavy rain sakal
मुंबई

Mumbai : पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळवा, भास्कर नगर जवळील डोंगरावरून आलेला पाण्याचा मोठा प्रवाह भास्कर नगर येथील मारुती चाळीत घुसला. त्यावेळी, त्या पाण्याच्या प्रवाहात अभी सिंह मौर्या हा ४ वर्षीय चिमुरडा वाहून गेला होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी राहत्या घरापासून ५०० मीटर अंतरावरील मफतलाल कंपनीजवळील नाल्यात सापडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळवा भास्करनगर येथील डोंगरावरील पाण्याचा मोठा प्रवाह डोंगरजवळील चाळीत शिरला. याचदरम्यान अभी सिंह मौर्या हा चिमुरडा पाण्याचा प्रवाहासोबत वाहून गेल्याची शक्यता तेथील स्थानिक रहिवाशांनी वर्तविली आहे. तथापि प्रत्यक्ष दर्शनी कोणीही ठामपणे सांगत नव्हते. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त व कळवा पोलिसांनी धाव घेतली.

घटनास्थळ भास्कर नगरमधून मफतलाल कंपाऊंडकडे जाणारा नाला आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्यामार्फत सुमारे ०३-तास नाल्यामध्ये शोधकार्य करण्यात आले. मात्र रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे कळवा वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या आदेशानुसार शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी सकाळी ०८:३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा शोधकार्याला सुरू झाली. त्यानंतर अवघ्या ३० ते ४० मिनिटांतच त्या चिमुरड्याचा मृतदेह मफतलाल कंपनीजवळील नाल्यात सापडला. तो मृतदेह पोलिसांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Electricity Bills: आता मंत्र्यांना लाईट बिल स्वतःच्या खिशातून भरावं लागणार; 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय

Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, टोकाला जायला...", विशाल पाटील अन् कदमांना इशारा, काय आहे प्रकरण?

Kitchen Hacks : सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स वापरून पाहा, वर्षभर राहतील ताजे अन् खराबही होणार नाही

Chandu Champion : "रडून रडून माझी अवस्था वाईट झाली"; चंदू चॅम्पियनचं शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी केलं भरभरून कौतुक

MG Comet EV : भारताची सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार पाहिलीत काय? जाणून घ्या शॉकिंग फीचर्स आणि इतकी कमी किंमत

SCROLL FOR NEXT