mumbai sakal
मुंबई

Mumbai news : सेवानिवृत्त शिक्षकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

नितीन पाटील

मुंबई : वर्षभरापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावमधून प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या एका वसतिशाळा शिक्षकावर सध्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बकऱ्या चारण्याची वेळ आली आहे. सेवानिवृत्तीनंतर कोणतेच लाभ न मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर पेच उभा राहिला आहे. पूर्वाश्रमीचे वसतिशाळा शिक्षक प्रभाकर बिरहारे वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्तीनंतर कोणतेच लाभ न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.२००१ मध्ये राज्यभरातील वाड्या-वस्त्या, तांडे आणि डोंगर-कपारीत राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने राज्य शासनाने राज्यभरात ८६६५ वसतिशाळा सुरू केल्या. वसतिशाळांवर शिक्षकांची नेमणूक करताना वयाची कोणतीच अट नव्हती. तेव्हा कमी-अधिक वयाचे शिक्षणशास्त्र पदविका घेतलेले अनेक बेरोजगार तरुण त्यात सहभागी झाले.

पुढे वसतिशाळा शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियमित शिक्षक म्हणून सामावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागली. त्यासाठी वसतिशाळा शिक्षक संघटनांनी अनेक धरणे आणि आंदोलने केली. अखेर शासनाने १ मार्च २०१४ पासून सर्व ८६६५ वसतिशाळा शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियमित प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेतले; परंतु तसे करताना त्यांची २००१ पासूनची सेवा ग्राह्य धरण्यात आली नाही.

१ मार्च २०१४ पासूनची सेवा ग्राह्य धरण्यात आली. २०१४ पासून त्यांची नियुक्ती झाली असे ग्राह्य धरल्याने ते २००५ नंतरचे कर्मचारी ठरले. शासनाच्या निर्णयानुसार नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. परिणामी, वसतिशाळा शिक्षकांना २००५ पूर्वीच्या सेवा ग्राह्य न धरल्याने त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आला नाही.

प्रभाकर बिरहारे यांच्यासारखे अनेक वसतिशाळा शिक्षक आहेत जे मागील तीनचार वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. पैशांअभावी उदरनिर्वाहासाठी बकऱ्या चारण्यापासून अनेक कामे करावी लागत आहेत. त्यामुळे २००१ पासून कार्यरत असलेल्या सर्व ८६६५ वसतिशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

२०१४ मध्ये नियमित शिक्षक म्हणून सेवेत घेताना सुरुवातीला अंशदायी पेन्शन योजना लागू केली. पुढे ती राष्ट्रीय पेन्शन योजनेत वर्ग झाली. आम्ही २००५ पूर्वी वसतिशाळांवर नियुक्त झालेलो असल्याने आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी.

- छगन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष,

वसतिशाळा शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य वसतिशाळा शिक्षकांबाबत जुनी पेन्शन योजना आणि अन्य बाबतीत शासन स्तरावर विचार सुरू आहे. हा धोरणात्मक निर्णय आहे. किती वसतिशाळा शिक्षक या योजनेत बसू शकतात, त्याबाबत किती भार पडू शकेल याचा विचार सुरू आहे.

- शरद गोसावी, शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य

जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने सेवानिवृत्तीनंतर कोणतेच लाभ मिळाले नाहीत. दोन मुलांचे शिक्षण सुरू आहे. उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. अखेर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बकऱ्या चारतो. वसतिशाळा शिक्षकांना मूळ नियुक्ती दिनांकापासून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी आहे.

- प्रभाकर बिरहारे,

सेवानिवृत्त वसतिशाळा शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : महाराष्ट्रात १४ मे ते २० मे दरम्यान जोरदार पाऊस होणार?; कोकणात पुढचे दोन दिवस महत्वाचे

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्याचा पारा पुन्हा उंचावला, तापमान ४२ अंशांवर

Charging Cable Tips : रोजच्या 'या' 5 चुकांमुळे चार्जिंग केबल होते लवकर खराब! ती वारंवार तुटण्यामागचे खरे कारण पाहाच

वेंकटेश प्रसाद यांचा प्रयत्न फसला? बंगळूरची फायनल अचानक अहमदाबादला का गेली? कर्नाटक क्रिकेट संघटनेने व्यक्त केली जाहीर नाराजी

Rabindranath Tagore History: ८८४ ते १८९२ दरम्यान टागोरांचे सोलापुरात वास्तव्य; साहित्यनिर्मितीला मिळाली नवी दिशा, तीन वेळा वास्तव्यातील ऐतिहासिक ठसा!

SCROLL FOR NEXT