Local Train Esakal
मुंबई

Mumbai Local Train Update : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या पहिल्या फास्ट लोकलची वेळ बदलली

रोहित कणसे

मुंबई : रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आता मध्य रेल्वेची पहिली फास्ट लोकल ही सीएमएसटी रेल्वे स्थानकावरून सकाळी 4.35 वाजता सुटणार आहे. ही लोकल पुढे खोपोली पर्यंत धावणार आहे.

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी असून मध्य रेल्वेने (CR) 4.24 च स्लो CSMT-खोपोली उपनगरी लोकल सेवा अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच 10 ऑगस्टपासून ही रेल्वे फास्ट लोकल म्हणून धावणार आहे.

यामुळे असंख्य प्रवाशांची सोय होणार असून प्रवासाच्या वेळ कमी झाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी सीएसएमटी येथून पहाटे 4.35 वाजता सुटेल. सुधारित वेळापत्रकानुसार, ट्रेन भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावर थांबेल अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रवाशांचे दररोज 11 मिनिटे वाचतील

नव्याने सुरू करण्यात झालेली ही फास्ट लोकल गाडी सुटण्याच्या वेळेत कोणताही बदल न करता देखील पहाटे ही गाडी 5.55 वाजेपर्यंत कल्याणला पोहोचेल. या बदलामुळे प्रवाशांची त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान तब्बल 11 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

पावणेसहा पर्यंत वाट पाहावी लागणार नाही

सीएसएमटी वरून सकाळी 4.19 मिनिटांनी पहिली कसारा लोकल सुटते, त्यानंच खोपोली लोकल 4.24 मिनिटांनी रवाना होते. त्याच लोकलला जलद लोकल मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. सध्या पहिली लोकल 5.20 मिनिटांनी सुटते पण ती एसी लोकल असते त्यामुळे पऊणेसहा पर्यंत वाट पाहावी लागते. नव्या फास्ट लोकलमुळे प्रवाशांची ही अडचण दूर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT