Gyanvapi Masjid : मंदिराखालचं तळघर अन् बेपत्ता राणी...; 'ज्ञानवापी'बद्दल काँग्रेस अध्यक्षांनी लिहिलेली गोष्ट नेमाडेंनी सांगितली

bhalchandra nemade gyanvapi masjid basements story Pattabhi Sitaramayya aurangzeb demolished kashi vishwanath temple
bhalchandra nemade gyanvapi masjid basements story Pattabhi Sitaramayya aurangzeb demolished kashi vishwanath temple

वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेली ज्ञानवापी मशीद मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ही मशिद येथील प्राचिन मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा केला जातो. मागच्या वर्षी ५ महिलांनी कोर्टात धाव घेत मशीद परिसरातील श्रृगांर गौरी मंदिरात पूजा करण्याची परवानगीसोबतच सर्व्हे करण्याची देखील मागणी केली होती.

नेमाडेंचा खळबळजनक दावा...

या वादात जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी देखील उडी घेतल्याचे पाहायला मिळाले. नेमाडेंनी एका कार्यक्रमात औरंगजेबाबद्दल चुकीचं सांगितलं जातंय, तो तसा नव्हताचं. सर्वात आधी सती प्रथा बंद करणारा लॉर्ड बेंटिक नव्हता, तर औरंगजेबाने सतीची प्रथा बंद केली, असं वक्तव्य केलं.

इतकेच नाही तर, नेमाडे यांनी काशी-विश्वेश्वर येथील पंडितांकडून तरुण बायका भ्रष्ट केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या परत आल्या नाहीत. चौकशी केल्यास समजले की तेथील पंडित तरुण बायकांना भूयारी मार्गातून नेऊन भ्रष्ट करायचे. औरंगजेबाला जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा त्याने ज्ञानवापीची मोडतोड केली असेही वक्तव्य केलं. पण या दाव्याला आधार काय? असा प्रश्न पडू शकतो. आज आपण या दाव्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

bhalchandra nemade gyanvapi masjid basements story Pattabhi Sitaramayya aurangzeb demolished kashi vishwanath temple
Bhalchandra Nemade: 'इंग्रजांनी महाराष्ट्राला पेशव्यांच्या तावडीतून सोडवलं'; भालचंद्र नेमाडे यांचं वक्तव्य

याला आधार काय आहे?

वाराणसी येथील विश्वनाथ मंदिर पाडून मशीद उभारल्याबद्दल वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. बरेच जण औरंगजेबाच्या काळात मंदिर पाडण्याचे आदेश दिले गेल्याचे सांगतात. यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले पट्टाभी सीतारामय्या यांच्या एका पुस्तकाचा दाखला दिला जातो. १९४२ ते १९४५ यादरम्यान तुरूंगात असताना त्यांनी जेल डायरी लिहीली होती. ती १९४६ मध्ये पुस्तक रुपात 'Feathers And Stones' या नावाने छापण्यात आली.

दरम्यान त्यांच्या 'फीदर्स अँड स्टोन्स' या पुस्तकातील दोन पानांवर ज्ञानवापी मशिदीबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात हिंदू पक्षाकडून काशी विश्वनाथ मंदिराबद्दल त्यांनी लिहीलेलं खोटं आणि बनावट असल्याचे म्हटलं जातं. पट्टाभी यांनी त्यांच्या मौलाना मित्राच्या हस्तलिखिताचा संदर्भ देत या पुस्तकात मोठा दावा केला होता. पट्टाभी सीतारामय्या यांच्या 'फेदर्स अँड स्टोन्स' या पुस्तकात विश्वनाथ मंदिर पाडण्याचा औरंगजेबाचा आदेश आणि त्याचे कारण देण्यात आले आहे.

bhalchandra nemade gyanvapi masjid basements story Pattabhi Sitaramayya aurangzeb demolished kashi vishwanath temple
Jayant Patil : अमित शाहांना भेटल्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा, म्हणाले...

पट्टाभी सितरामय्या यांनी काय लिहीलं?

'एकदा औरंगजेब बनारस जवळून जात होता. सर्व हिंदू दरबारी गंगेत स्नान आणि भगवान शिवचे दर्शन घेण्यासाठी आपल्या कुटुंबासह काशीला आले. मंदिरात दर्शन घेऊन लोक परतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की कच्छची राणी गायब आहे. आत-बाहेर, पूर्व, पश्चिम, उत्तर-दक्षिण शोध घेण्यात आला परंतु त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. कसून शोध घेतला असता तेथे एक तळघर आढळून आले.

मंदिराखालील गुप्त ठिकाणाबद्दल लोकांना समजले. नुसते पाहूण देखील ते मंदिर दुमजली असल्याचे दिसून येत असे. तळघरात जाण्याचा मार्ग बंद असल्याचे आढळून आल्याने तो तोडण्यात आला. तर या तळघरात ती राणी कुठल्याही अलंकारांशिवाय दिसून आली. येथील महंत हे श्रीमंत आणि दागिने घातलेल्या भाविकांना मंदिर दाखवण्याच्या नावाखाली तळघरात आणून त्यांचे दागिने लुटायचे, अशी माहिती समोर आली. यानंतर त्याच्या जीवाचे काय होत असे ते मला माहीत नाही. मात्र, या प्रकरणात तातडीने सखोल शोधमोहीम राबवल्याने राणी सापडली.

पुजाऱ्यांच्या या दुष्कृत्याबद्दल औरंगजेबाला कळाले तेव्हा तो खूप संतापला. जिथे हा लुटमारीचा प्रकार घडतो ते देवाचे घर असू शकत नाही, असे त्यांनी जाहीर केले आणि मंदिर पाडण्यात आले. पण ज्या राणीची सुटका झाली तिने त्या ढिगाऱ्यावर मशीद बांधायला सांगितली आणि तिला खुश करण्यासाठी तेथे मशीद बांधण्यात आली. अशा प्रकारे काशी विश्वनाथ मंदिराच्या शेजारी ही मशीद अस्तित्वात आली.... बनारस मशिदीची ही कथा लखनऊमधील एका प्रसिद्ध मौलानासोबत दुर्मिळ हस्तलिखितात नोंदवली गेली होती.'

मौलानाने सीतारामय्यांच्या एका मित्राला याबाबत सांगितले आणि गरज पडल्यास हस्तलिखित दाखवू असे सांगितले. नंतर मौलाना मरण पावले आणि सीतारामय्या यांचेही निधन झाले. पण ते आपल्या मित्राचे आणि लखनऊच्या मौलानाचे नाव सांगू शकले नाहीत.

bhalchandra nemade gyanvapi masjid basements story Pattabhi Sitaramayya aurangzeb demolished kashi vishwanath temple
Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदासाठी नाना पटोलेही इच्छूक; म्हणाले, देवाला मला...

हिंदू पक्षाचे म्हणणे काय?

हिंदू पक्षाचे याबद्दल म्हणणे आहे की, पट्टाभी सीतारामय्यांच्या पुस्तकाने संभ्रम पसरवला आहे आणि अशाच पद्धतीने काही इतिहासकारांनी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचे समर्थन केले आहे. हिंदू बाजू मांडणारा गट आणि संतांचे म्हणणे आहे की औरंगजेबाच्या काळात जवळपास दररोजच्या घटनांचे दस्तऐवजीकरण केले जात होते, परंतु कोठेही बलात्कार किंवा लूटमारीच्या घटनेचा उल्लेख नाही.

काही जण असेही म्हणतात की, औरंगजेबाच्या बंगाल आणि बनारसच्या भेटीचा इतिहासात उल्लेख नाही, मग पट्टाभी सीतारामय्या यांना ते कसे कळले? तसेच औरंगजेबाने १६६९ मध्ये मंदिर पाडण्याचा आदेश दिला होता, त्यानंतर ज्ञानवापी मशिदीचा पाया घातला गेला असे मानले जाते. मात्र, मंदिर पाडून मशीद बांधल्याचा दावा मुस्लीम पक्षकार नाकारतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com