Mumbai Local Esakal
मुंबई

Mumbai Local: मुंबईत पावसाचा धुमाकूळ, तिन्ही मार्गांवर रेल्वे सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

पावसामुळे मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातलं आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे, उपनगर परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाचा मोठा फटका मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेला देखील बसला आहे. पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन कामाच्या वेळी जाताना चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

दरम्यान मुंबईत कोसळत असलेल्या पावसाचा फटका मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुंबईत महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची गती मंदावली आहे. लाखो मुंबईकर मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन प्रवास करतात. पावसाचा या लोकल सेवेला फटका बसला आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे. पावसामुळे अनेक स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. यामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनीचे उशिराने सुरू आहे. तर मध्य रेल्वे १२ ते १५ मिनीटे उशिरा आहे. यासह हर्बल रेल्वे १५ ते २० मिनीटे उशिराने सुरू आहे.

उशिरा लोकल सुरू असल्याने ऑफिसला पोहोचणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान मुंबईत मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मागच्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. काल मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

Latest Marathi News Live Update : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत चर्चा नाही; राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा

Vishnupuri Dam: प्रकल्प तहानलेलेच! विष्णुपुरीत ३३.४५ टक्के साठा

Bhokardan Theft: चहासाठी थांबल्या, नऊ लाख गेले; वाहनाची काच फोडून रक्कम लंपास, बचत गटाच्या महिलांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT