MHADA Konkan Mandal extended
MHADA Konkan Mandal extended  Sakal
मुंबई

Mhada Konkan Mandal : नियमांत बदलांनंतरही अर्जदारांना करावा लागतोय अडचणींचा सामना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी अर्ज करतेवेळी ऑनलाइन अनामत रक्कम भरणा करतांना संबंधित ऑनलाइन प्लॅटफॉर्म (मर्चंड) कडून जीएसटीसह काही अतिरिक्त रक्कम भरावी लागत असल्याने अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, अनेक बँकांच्या डेबिट कार्डवरून ऑनलाइन भरणा होत नसल्याने अर्जदारांना रक्कम भरण्यातही अडचणी येत आहे.

म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी शेवटचे २ दिवस तर आहेत. तर अर्ज जमा करण्यासाठी केवळ ४ दिवसांची मुदत शिल्लक आहे.

एकीकडे म्हाडाकडून काही नियमांत बदल करून कागदपत्रे जमा करणे आणि अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत येत असलेल्या अडचणी सोडवल्या जात असताना आता अर्जदारांना डिजिटल तसेच कार्ड पेमेंट करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

अनेक बँकांची डेबिट आणि क्रेडिट कार्ड ऑनलाइन पेमेंटसाठी ग्राह्य धरली जात नाही आहेत. तसेच, व्हिसा आणि मास्टरकार्ड सोडता इतर कार्ड प्रक्रियेत ग्राह्य धरले जात नसल्याने अर्जदारांना अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करताना अडचण निर्माण होते आहे.

तसेच, ऑनलाइन पेमेंट मर्चंडकडून काही किरकोळ अतिरिक्त रक्कम जीएसटीसह घेतली जात असल्याने ही रक्कम नेमकी कसली यावरून अर्जदारांमध्ये संभ्रम आहे.

सुरुवातीपासूनच म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीत अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सुरुवातीलाच कागदपत्रे सादर करण्याबाबतच्या नव्या प्रक्रियेचा फटका अनेकांना या सोडतीत बसला.

वेळेत कागदपत्र नसल्याने अनेकांना या सोडतीत अर्ज दाखल करता आले नाही. असे असताना आता शेवटच्या २ दिवसांतही अर्जदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

"ऑनलाइन रक्कम भरणा करताना घेतली जात असलेली अतिरिक्त रक्कम ही आरबीआयने १ एप्रिल पासून ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे संबंधित मर्चंड करून आकारण्यात येत आहे. तसेच, मास्टर डेबिट कार्ड आणि व्हीजा कार्डवरून रक्कम भरण्यात कोणतीही अडचण येत नाही. तरीही अर्जदारांना कोणतीही अडचण येत असल्यास त्यांनी तात्काळ आमच्या सहायता कक्षाशी संपर्क साधावा", असे आवाहन म्हाडाने केले आहे.

म्हाडा सहायता कक्ष संपर्क क्रमांक

022 26598924/ 022 69468100/ 9834637538/ 7972189767

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''तू निवडून कसा येतो तेच बघतो'' अजित पवारांनी धमकी दिलेल्या 'त्या' तीन उमेदवारांचं काय झालं?

Mukesh Ambani: मुकेश अंबानींचा मेगा प्लॅन! नवी मुंबईत घेतली 3,750 एकर जमीन; इतक्या हजार कोटींची झाली डील

Ind vs Ire : ओपनिंगपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत बदले टीम इंडियाचे चित्र... जाणून घ्या आयर्लंडविरुद्ध कशी असेल Playing-XI

Sharad Pawar : ''जरांगेंबद्दल माहिती नाही, पण सरकारमध्ये नाराजी होती'', शरद पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

Nagpur Lok Sabha Election Result : विजयाची हॅट्‌ट्रिक! गडकरींकडून ठाकरे पराभूत

SCROLL FOR NEXT