Sea subway railway 
मुंबई

Sea subway railway : भारतातील पहिला समुद्री भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीत! हायस्पीड रेल कॉरिडॉरमधील महत्त्वाचा टप्पा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतातील पहिला समुद्री भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीतून बांधण्यात येणार आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरमधील हा एक महत्वाचा टप्पा असणार आहे. अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी २१ किमी लांबीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे ज्यामध्ये ७ किमी लांबीचा भुयारी मार्ग हा ठाणे खाडीतून जाणार आहे. यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

नॅशनल हाय वे रेल कॉर्पोरेशनने शुक्रवार (ता.९) रोजी मे. अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीसोबत हा करार करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र उभारण्यात येणाऱ्या पहिल्या ७ किमी लांबीच्या समुद्राखालची रेल्वे भुयारी मार्गासह २१ किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या निविदेच्या तांत्रिक बिडिंग ९ फेब्रुवारी २०२३ रोजी उघडण्यात आल्या आणि ६ एप्रिल २०२३ रोजी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या.

हा बोगदा बीकेसी भूमिगत स्थानक ते शिळफाटा असेल. ठाणे खाडीत ७ किमी लांबीचा बोगदा हा भारतातील पहिला समुद्री बोगदा असेल. हा बोगदा एकेरी असून बोगद्यात दुपदरी ट्रॅक उभारणी करण्यात येईल. या बोगद्याच्या क्षेत्रात ३७ स्थानांवर ३९ उपकरण खोल्या उभारण्यात येतील.

बोगद्याच्या बांधकामासाठी १३.१ मीटर व्यासाचे कटर हेड असलेले टीबीएम वापरण्यात येणार आहे. एमआरटीएस - मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणार्‍या शहरी बोगद्यांसाठी साधारणपणे ५ ते ६ मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जाते. बोगद्याच्या १६ किमी मार्गातील बांधकामासाठी ३ टनेल बोअरिंग मशीन वापरल्या जाणार आहे. आणि उर्वरित ५ किमीसाठी न्यू ऑस्ट्रियाई टनलिंग विधी चा वापर केला जाईल.

हा बोगदा जमिनीपासून २५ ते ६५ मीटर खोल असणार आहे. बीकेसी (पॅकेज सी १) अंतर्गत विक्रोळी आणि सावली मध्ये अनुक्रमे ३६, ५६ आणि ३९ मी खोलीची परवानगी देण्यात आली आहे. घणसोलीमध्ये ४२ मीटर इन्क्लिनेड शाफ्ट आणि शिळफाटामध्ये टनल पोर्टल एमटीएम टनलिंगच्या माध्यमातून जवळपास ५ किमी लांबीचा बोगदा बांधला जाईल.

"२१ किमी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम हे मुंबई-अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरमधील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक आहे, ज्यामध्ये ठाणे खाडी येथे ७ किमी सागरी भुयारी रेल्वे मार्गाचा समावेश आहे. देशातील पहिल्या समुद्राखालील पहिल्या दुहेरी बोगद्याच्या बांधकामात तीन बोरिंग मशीन आणि ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर केला जाणार आहे."

- राजेंद्र प्रसाद, व्यवस्थापकीय संचालक, एनएचआरसीएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT