Mumbai sakal
मुंबई

Mumbai : 'तोंडात लपवलेले ब्लेड काढले आणि..' तडीपार गुंडाचा वासेपूर स्टाईल पोलीस ठाण्यात धुडगूस

त्यामुळे आरोपीला एप्रिल महिन्यात तडीपार करण्यात आले होते.मेहराज अचानक भायखळा पोलीस ठाण्यात आला व त्याला हमजाने पाठवलेले संदेश दाखवले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एक तडीपार गुंड भायखळा पोलीस ठाण्यात ब्लेड घेऊन आला आणि एकच खळबळ उडाली. एका व्यक्तीची तक्रार करण्यासाठी आलेल्या या गुंडाने संबंधिताला तात्काळ अटक करा अन्यथा मी स्वतःला ब्लेड मारून तुम्हाला या प्रकरणात गुंतवीन, असे धमकावत गोंधळ घातला. एवढेच नाही,

त्याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने मारहाणही केली. पोलीस ठाण्यात, तसेच रुग्णालयात आरोपीने प्रचंड गोंधळ घातला. या प्रकरणानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या गुंडाला अटक केली.पोलीस उपनिरीक्षक बालाजी आसादे भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी मेहराज मुर्तझा ऊर्फ पिंडारील भायखळा पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी हत्येचा प्रयत्न, मारहाण, जबरी चोरी असे गंभीर सात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आरोपीला एप्रिल महिन्यात तडीपार करण्यात आले होते.मेहराज अचानक भायखळा पोलीस ठाण्यात आला व त्याला हमजाने पाठवलेले संदेश दाखवले. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून हमजाला अटक करण्याची मागणी मेहराजने केली.

या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी त्याला समजावले. पण मेहराज ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने तोंडात लपवलेले ब्लेड काढले आणि स्वतःला ब्लेड मारून याप्रकरणात तुम्हाला गुंतवतो, अशी धमकी पोलिसांना दिली. त्यावेळी पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी त्याला रोखले आणि त्याचे हात बांधून त्याला जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळीही त्याने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकारानंतर भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मेहराजला अटक केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT