Pune Water Close : दक्षिण पुण्यातील पाणी बंदसाठी स्वतंत्र नियोजन

एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तविल्याने महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
water close
water closesakal

पुणे - एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तविल्याने महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, शुक्रवारपासून पाणी पुरवठा सुरळीत करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे.

भौगोलिक रचना, पंपिंग व वितरण व्यवस्थेमधील तांत्रिक अडचणीमुळे दक्षिण पुण्याचा भाग असलेल्या वडगाव बुद्रूक जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वडगाव बुद्रूक, धनकवडी, आंबेगावपठार, आगम मंदिर, बालाजीनगर, कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी, अप्पर इंदिरानगर भागासाठी स्वतंत्रपणे नियोजन केले आहे.

या परिसरात एकाच दिवशी पाणीपुरवठा बंद न ठेवता, प्रत्येक दिवशी ठरावीक भागातील पाणी बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे या भागातील दुसऱ्या दिवशी या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या गुरुवारपासून (ता. २५) केली जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

water close
Mahavikas Aghadi March : टेंडर राज आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीचा पुणे महापालिकेवर मोर्चा

कोणत्या दिवशी कोणत्या भागात पाणी बंद

सोमवार - सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, जाधवनगर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, सिंहगड रस्ता परिसरकांडगेपार्क, मोहिते टाऊनशिप परिसर खोराडवस्ती परिसर, संपूर्ण वडगाव परिसर, चव्हाण बाग, डीएसके विश्‍व रस्ता, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंत, राजयोग सोसायटी परिसर, आनंद मंगल कार्यालय परिसर, अभिरुची परिसर, समर्थनगर, दांगटनगर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, गोयल गंगा, सनसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनलपार्क, माणिकबाग परिसर इ. हायवे बायपास परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर, आंबेगाव बु।। शिवसृष्टी परिसर विकासनगर, घुलेनगर, धबाडी, सर्वे क्रमांक ४५, ४७, ४८ निवृत्तीनगर, विष्णुपुरम, तुकाईनगर आणि परिसर.

मंगळवार - आगम मंदिर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर, आचलफार्म

बुधवार - बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे क्रमांक २३, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पिटल परिसर, संपूर्ण आंबेगाव पठार परिसर, राजे चौक, महाराणा प्रताप चौक, सर्वे क्रमांक १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, श्रीमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर

water close
Fire Brigade Tender : अग्नीशामक दलाच्या निविदेसाठी राजकीय दबाव

गुरुवार - सहकारनगर भाग-१, दाते बसस्टॉप परिसर, धनकवडी सर्वे क्रमांक ७,८,२,३, धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर चैतन्यनगर, सर्वे क्रमांक ३४, ३५, ३६, ३७, सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर

शुक्रवार - गुजरवाडी निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर, वरखडेनगर, जाधवनगर, उक्तर्ष सोसायटी, शेलारमळा सुंदरबन सोसायटी, महादेवनगर, माऊलीनगर, शिवशंभोनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, राजस सोसायटी, वाघजाईनगर, सुखसागरनगर भाग-१, आंबामाता मंदिर मागील परिसर, निरंजन सोसायटी, निलया सोसायटी, मॅजिक टॉवर, गंगा ओसियन व हिरामण बनकर शाळेजवळील परिसर, स्वामी समर्थनगर

शनिवार - साईनगर, गजानन नगर, राजीवगांधीनगर काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क, सुखसागरनगर भाग-२, वाघजाईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा बुद्रूक (गावठाण), वटेश्वर मंदिर परिसर, उन्नतीधाम सोसायटी, हागवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथनगर, अजमेरा पार्क, पवननगर, अंबिकानगर, सरगमनगर, बिलाल मस्जिद परिसर, शिवरायनगर, शांतिनगर सोसायटी, महानंदा

रविवार - टिळेकरनगर, कामठेपाटीलनगर, कोलतेपाटील सोसायटी, आकृती सोसायटी, मिनू मेहतानगर, बधेनगर, खडीमशीन चौक, पिसोळी रोड, ई-स्कॉन मंदिरपरिसर, प्रतिभा सोसायटी, उन्नती सोसायटी, कपिलनगर, आंबेडकरनगर, कोंढवा बुद्रूक ( अंशःता भाग), पारगेनगर, एच ऍण्ड एम. सोसायटी, शोभा गार्नेट सोसायटी, शोभा आयवरी सोसायटी, तालाब कंपनी परिसर, सर्वे क्रमांक १५, सागर कामठेनगर, पुण्यधाम आश्रमनगर, टायनी इंडस्ट्रिअल परिसर, वाघ वस्ती, श्रद्धानगर, विष्णू ठोसरनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, संपूर्ण येवलेवाडी गाव, राजमाता कॉलनी परिसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com