रेश्मा त्रेंचिल  
मुंबई

मुंबई: रेश्मा त्रेंचिल आत्महत्या प्रकरण, वैमानिकाला अटक

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय म्हटलय?

दीनानाथ परब

मुंबई: अंधेरीत साकीनाका (Andheri sakinaka) येथील तुलिपिया इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या (suicide case) करुन जीवन संपवलं. तिने आपल्या सातवर्षाच्या मुलासह इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन उडी मारली. रेश्मा त्रेंचिल (Reshma Trenchil) (44) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यासोबत गरूड(7) या त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. रेश्मा त्रेंचिल या माजी पत्रकार आहेत. (Mumbai Reshma Trenchil suicide case nighbour pilot arrested by police)

पोलिसांनी या प्रकरणात एका वैमानिकाला अटक केली आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. रेश्मा त्रेंचिल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक पानाची चिठ्ठी लिहिली होती. त्या आधारावर शादाब खानला अटक केली. तो पेशाने वैमानिक आहे. शादाब खान यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपण टोकाचे पाऊल उचलत आहोत, असे तिने चिठ्ठीत लिहिले होते.

रेश्मा त्रेंचिल यांचा भाऊ अमेरिकेत असून अंत्यसंस्कार करण्यासाठी तो शुक्रवारी मुंबईत येत आहे. शादाबला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शादाबचे पालक अयुब खान आणि शेहनाझ खान यांना अटक करण्यात आलेली नाही. "नैराश्य आणि खान कुटुंबाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं रेश्मा त्रेंचिल यांनी चिठ्ठीमध्ये म्हटलं होतं. नवरा आणि सासू-सासऱ्यांचा मे महिन्यात कोविडमुळे मृत्यू झाला. तेव्हापासून त्या नैराश्यामध्ये होत्या" असे साकीनाका पोलीस ठाण्याचे बळवंत देशमुख यांनी सांगितले.

शरद मुलूकुट्ला (49) असे रेश्मा यांच्या पतीचे नाव होते. ते ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफोर्वर अॅग्रीकल्चरल कमोडिटी विभागात प्रमुख म्हणून काम करत होते. रेश्मा या गृहिणी होत्या. त्यांच्या पतीचे आई-वडील वाराणसीमध्ये राहतात. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार मिळावे म्हणून शरद हे वारणसीला गेले होते. पण दुर्दैवाने त्यांनाही कोविड झाला. चार आठवडे कोविडशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर रेश्मा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात पतीच्या अचानक झालेल्या निधनामुळे जीवन कसे बदलले आहे. हे त्यांनी मांडले. जीवनात कशा अडचणी आल्या आहेत, याबाबत त्यांनी लिहीले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meena river flood impact: मीना नदीत जलपर्णी व कचऱ्यामुळे प्रवाह अडला; पुराचे पाणी शेतात घुसून सुपीक माती वाहून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Pune Metro Delay: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुलकावणी; पीएमआरडीएच्या चौथ्या घोषणेलाही फोल

Smart Meter Policy: ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणचा शब्द

Apple Orchard Protection : समुद्रातील जुन्या जाळ्या अन् बांबूची कमाल! सफरचंदाच्या बागेसाठी शेतकऱ्याचा अजब जुगाड; फक्त 35 हजारांत माकडं अन् पक्ष्यांपासून मिळवलं 'सुरक्षा कवच'

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

SCROLL FOR NEXT