मुंबई विद्यापीठ sakal
मुंबई

मुंबई विद्यापीठातील प्रवेश रामभरोसे

चार वर्षांपासून प्रवेश देखरेख समितीचा नामोनिशान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नॅकने सर्वात मोठे नामांकन बहाल केलेल्या मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यातील प्रवेश हे रामभरोसे सुरू आहेत. महाविद्यालयांना वाट्टेल तशा प्रकारे ते प्रवेश करत असून त्यासाठी आवश्यक असलेली प्रवेश देखरेख समितीच मागील चार वर्षांपासून विद्यापीठात कार्यरत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत ८०० हून वरिष्ठ महाविद्यालये, विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रम देणाऱ्या संस्था आहेत. यामधील सर्व प्रवेशासाठी विद्यापीठ केवळ नोंदणी करून प्रवेश करण्याची मुभा महाविद्यालयांमध्ये आपल्या मनमानीपणे ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून अनेक महाविद्यालयामध्ये होत असलेले प्रवेश आणि त्यासाठी गुणवत्ता, निकष हे धाब्यावर बसवून केले जात आहेत. त्यासाठी केवळ विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या सिनेटमध्ये युवा सेनेच्या सदस्यांकडून करण्यात आला.

विद्यापीठाने सर्वच प्रवेशासाठी प्रवेश देखरेख समिती का सुरू ठेवली नाही असा सवाल करत युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तर त्यावर पळवाट काढण्यासाठी प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी मधल्या काळात विद्यापीठ कायदा बदलल्याने त्यासाठी समित गठीत करण्यास वेळ लागल्याचे उत्तर दिले होते. मात्र ही समिती नसल्यामुळेच कोणत्याही महाविद्यालयांवर प्रवेशासाठी धाक बसला नाही,यामुळे सर्व ठिकाणी मनमानी सुरू असल्याचा आरोप सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप आणि डॉ. धनराज कोहचाडे यांनी केला आहे.

केवळ नोंदणी करून जबाबदारी टाळते

मुंबई विद्यापीठाने राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणे सर्व प्रवेश हे आपल्याच धर्तीवर करणे आवश्यक आहे. मात्र संस्थाचालक आणि महाविद्यालयांचे लाड पूरविण्यासाठी विद्यापीठ प्रवेशाच्या नोंदणीचा फार्स करते आणि त्यातून आपली जबाबदारी टाळते, असा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

Snake Bite : भोरमध्ये सर्पदंशाच्या घटनांत वाढ; तीन महिन्यांत १३१ घटना, वेळेत उपचारामुळे मृत्यू टळले

Daal Fara Recipe: नाश्त्यासाठी एकदा करून पाहाच! उत्तर प्रदेश-बिहारचा फेमस ‘दाल फरा’; प्रोटीनचा उत्तम स्रोत

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

SCROLL FOR NEXT