Mumbai-University sakal mumbai
मुंबई

मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

सदस्यांकडून कुलगुरूंची कोंडी करण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दोन वर्षांनंतर मुंबई विद्यापीठाची (Mumbai university) सिनेटची सर्वसाधारण सभा (Senate meeting) उद्या (ता. ७) विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ऑफलाईन (offline) पद्धतीने होणार आहे. या सिनेटमध्ये विद्यापीठातील विविध प्रश्नांवर वादळी चर्चा (big discussion) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठ प्रशासनाने सिनेटच्या आयोजनाची तयारी केली असून सदस्यांना विविध प्रश्नांवर बोलण्यासाठी बराच वेळ मिळणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन दिवस कामकाज चालण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाची सिनेट ऑनलाईन घेण्याची शक्यता होती; मात्र सदस्यांकडून ऑफलाईन पद्धतीने सिनेट घेण्याची मागणी केली होती.

अखेर विद्यापीठाने मंगळावारी (ता. ५) रात्री सिनेट ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले. कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी खरेदी केलेली महागडी गाडी, तसेच विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपासून न केलेल्या लेखापरिक्षाणासह अनेक विषयांवर युवा सेनेचे सिनेट सदस्य कुलगुरूंना धारेवर धरण्याची शक्यता आहे, विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनीही प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT