esakal | कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई ; NCB चे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण | Cruise Raid
sakal

बोलून बातमी शोधा

NCB

कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई ; NCB चे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : भरसमुद्रात क्रूझवर छापा मारून करण्यात आलेल्या कारवाईबाबत (Cruise raid) राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी बुधवारी (ता. ६) केलेल्या आरोपानंतर (Allegations) एनसीबीने (NCB press conference) तातडीने पत्रकार परिषद घेत पडद्यामागील मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांना समोर आणले. दोघेही खासगी साक्षीदार (private witness) असल्याचा खुलासा करीत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावले. रेव्ह पार्टीच्या (rave party) कारवाईत अनेक खासगी साक्षीदार असल्याचा खुलासाही केला.

हेही वाचा: कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस

एनसीबीने कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
एनसीबीने पत्रकार परिषद घेत रेव्ह पार्टीचे अर्धा डझन साक्षीदार असल्याचे सांगितले. नवाब मलिक यांचा आरोप निरर्थक आहे. अशा प्रकारचा आरोप तपासयंत्रणेला बदनाम करण्यासाठी होत असल्याचा खुलासा करण्यात आला. मलिक यांनी एनसीबीने कारवाईत अन्य खासगी व्यक्तींचा समावेश केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. एनसीबीने त्याबाबत तातडीने खुलासा केला. एनसीबी कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने काम करते.

कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करीत नाही. क्रूझ रेव्ह पार्टीवरील छाप्यानंतर त्याचे पंचनामेही करण्यात आलेले होते. मनीष भानुशाली याने वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यानेच एनसीबीला रेव्ह पार्टीची टीप दिली असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी तयार केलेल्या पंचनाम्यावर सह्या असल्याचेही स्पष्ट करण्यात आले, असे सांगण्यात आले.

loading image
go to top