mumbai university sakal media
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा होणार नोव्हेंबरमध्ये

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) २०२१ च्या हिवाळी सत्राच्या (Winter session) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक (Exam timetable) आज जाहीर केले आहे. पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र-५ च्या परीक्षा १७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१ दरम्यान होतील. या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने ऑनलाईन (online) होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

विद्यापीठाच्या कला , वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र १ व ३, अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र पदवी परीक्षा सत्र ७, बीएड परीक्षा सत्र ३, विधी पदवी परीक्षा सत्र ५ व ९ या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्र जाहीर करण्यात येईल व याची प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे. तसेच पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र ६ च्या बॅकलॉगच्या परीक्षा ७ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान होतील. तर पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र २ व ४ च्या बॅकलॉगच्या परीक्षा १ ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान होतील.

सत्र ५ च्या परीक्षांमध्ये विद्यापीठाकडून परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तसेच या परीक्षेसाठी प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार येणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये बीए (एमएमसी ), बीएमएस, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट ) , बीकॉम (बॅंकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट ), बीकॉम ( फायनान्स अँड मार्केटिंग ), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( कॉम्प्युटर सायन्स ), बीएस्सी ( बायोटेक्नॉलॉजी), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीएस्सी ( आयटी), बीएस्सी ( हॉस्पिटॅलिटी स्टडीज ), बीएस्सी ( एव्हीएशन) व बीएस्सी ( एरोनॉटिक्स) आदी आभ्यासक्रमाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT