Mumbai Water Lake Level 
मुंबई

Mumbai Water Lake Level : मुंबईची तहान भागवणारा ७ पैकी आणखी एक तलाव ओव्हरफ्लो; 'येथे' पाहा व्हिडीओ

रोहित कणसे

राज्यातील अनेक जिल्हात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यादरम्यान मुंबई शहर आणि परिसरात देखील मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतो आहे. या पार्श्वभूमिवर मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पाणीकपातीचं संकट घोंगावत असतानाच मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी आणखी एक धरण ओव्हर फ्लो झालं आहे.

मागील काही दिवसात होत असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम म्हणून नद्या नाले भरून वाहत आहेत. यादरम्यान मुंबईची तहान भागवणाऱ्या सात धरणांपैकी चार धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

"मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (२७ जुलै २०२३) रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे." अशी माहिती मुंबई महानगरपालिकच्या ट्वीटर हँडलवरून देण्यात आली आहे. दरम्यान हे धरण ओव्हर फ्लो झाल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे धरणातून ६००० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

हे तलाव झाले ओव्हरफ्लो

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍‌या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लिटर (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे. दरम्यान यापूर्वी तुळशी तलाव २० जुलैपासून ओसंडून वाहत आहे, तर विहार आणि तानसा तलाव बुधवार सकाळपासून ओव्हरफ्लो होऊ लागले आहेत. यानंतर आता काल मोडक सागर देखील फुल्लं झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT