खालापूर : अपघातस्थळी कार अजूनही पडून आहे. 
मुंबई

अपघातग्रस्त कारबाबत गूढ वाढले

सकाळ वृत्तसेवा

खालापूर ः खालापुरात आठवडाभरापूर्वी अपघात झालेली कार संशयास्पद अवस्थेत पडून असून, कारमधील तीन जणांनी जखमी अवस्थेत पळ काढल्याने कारचे गूढ वाढले आहे.

खालापूर शहरातून द्रुतगती मार्गाला जोडरस्ता असून, आठवड्यापूर्वी पहाटे वेगाने जाणारी कार जोगावडे वाड्यानजीक वळणावर वेग नियंत्रण न झाल्याने रस्ता सोडून दोन-तीन पलटी मारत शेतात पलटी झाली. कारमधील तिघांनी जखमी अवस्थेत कार सोडून पलायन केले. खालापूर पोलिसांनी कारचा पंचनामा केला आहे. आठवड्यानंतर ही कार अपघात ठिकाणी पडून असून, ब्रेडची पाकिटे आणि नायलॉन रस्सी 
सापडली आहे. 

खूशखबर : म्हाडाच्या घराचे स्वप्न साकार होणार

दरम्यान, कारमध्ये गुरे चोरणारी टोळी असण्याची शक्‍यता असून, गाडीच्या डिकीत गाय होती, असे काही ग्रामस्थ सांगतात. अपघातानंतर जखमी गाय परिसरात फिरत होती, असेही ग्रामस्थ सांगत आहेत.

अपघातग्रस्त कारबाबत चौकशी सुरू आहे. कारच्या क्रमांकावरून तपास सुरू आहे.
- संजय बांगर, सहायक पोलिस निरीक्षक, खालापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT