महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन लेटरहेड पाहिलेत का ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कात टाकत हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आपलं इंजिन नेलंय. अशात २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेच्या महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. या महाअधिवेशनात गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्या मनातील झेंडा त्यांनी लोकांसमोर आणलाय. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील रंगलेले पाहायला मिळालं. अशात आता बातमी समोर आलीये ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या लेटहेडची. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लेटरहेडवर आता राजमुद्रा छापण्यात आली आहे. 

हेही वाचा - चीनची आणखी एक वाहन कंपनी भारतात धुमाकूळ घालणार 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे लेटरहेड बदलण्यात आले आहेत. मुख्य लेटरहेडचा मथळा भगव्या रंगात आहे आणि त्यावर राजमुद्रा छापण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना हे लेटरहेड पाठवण्यात आले आहेत. 

महत्त्वाची बातमी  - मुख्यमंत्री असो वा आमदार, चौकशीसाठी बोलवलं जाईल'; वायरलेस रेकॉर्ड्सही तपासण्याची परवानगी

नवीन लेटरहेड आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना वापरणार असल्याने ते आपल्या पदाधिकाऱ्यांना पाठवताना राज ठाकरे यांनी प्रत्येकाचं नाव लिहीत त्यावर स्वाक्षरी केलेली पाहायला मिळतेय. संदीप देशपांडे यांनी या नवीन लेटरहेडचा फोटो ट्विटरवरून शेअर केलाय. 

now maharashtra navanirman sena will use letterheads with shivchatrapati rajmudra printed on it 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now maharashtra navanirman sena will use letterheads with shivchatrapati rajmudra printed on it