मुंबई

Navi Mumbai : 1250 रुपयांसाठी सद्दाम हुसेनने केली हत्या; पनवेलमधील धक्कादायक घटना

Turbhe Murder: कल्याण रेल्वे स्थानकातून गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Panvel: कामाचे पैसे देण्यात टाळाटाळ करणाऱ्या सुपरवायझरची चाकूने हल्ला करून हत्या करणाऱ्या कामगाराला कळंबोली पोलिसांनी शनिवारी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली आहे.


कळंबोलीत के.एल.-४ सोसायटीत राहणारा परवेझ अन्सारी हा नावडे तळोजा येथे एल ॲण्ड टी कंपनीत मनोज एंटरप्रायजेसच्या माध्यमातून सुपरवायझरचे काम करत होता. शुक्रवारी रात्री घरी असताना ११.३०च्या सुमारास सद्दाम हुसेनने कामाच्या पैशांच्या हिशेबासाठी परवेझ अन्सारीला कळंबोली सेक्टर-१४ मधील झुडिओ मॉलजवळ बोलावून घेतले.

परवेज अन्सारी हा आपला सहकारी मोहम्मद कौसर अन्सारी याच्यासोबत स्कुटीवरून झुडिओ मॉलजवळ गेला. यावेळी सद्दाम हुसेनने परवेझकडे कामाचे १,२५० रुपये देण्याची मागणी केली, अन्यथा सोडणार नसल्याची धमकी दिली होती. यावेळी परवेझने २० तारखेपर्यंत पैसे देणार असल्याचे सांगितले; पण त्याचा राग आल्याने सद्दामने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने परवेझच्या छातीवर व हातावर अनेक वार केले.

या हल्ल्यात जखमी परवेझचा एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी सद्दाम हुसेनविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. अखेर शनिवारी दुपारी कल्याण रेल्वे स्थानकातून गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT