File Photo 
मुंबई

कपडे बदलताना तिला चमकणारी वस्तू दिसली, अन्...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कपडे बदलत असताना छुप्या मोबाईलद्वारे चित्रीकरण करणाऱ्या एका माथेफिरूला पवई पोलिसांनी अटक केली. प्रदीप रॉय असे या माथेफिरूचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी (23) ही पवई येथे एका महिलेकडे कामाला असून, या महिलेच्याच घरात तिच्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी पीडित तरुणीकडे होती. याच महिलेच्या घरात जेवण बनविण्याचे काम प्रदीप रॉय करतो. घरात पीडित तरुणीला राहण्यासाठी वेगळी खोली होती. मात्र नोकर वर्गासाठी स्वच्छतागृह मात्र एकच होते. एके दिवशी या स्वच्छतागृहात पीडित तरुणी कपडे बदलत असताना तिला स्वच्छतागृहात काही तरी चमकत असल्याचे आढळले.

तुम्हाला हे माहित आहे का... भारतात सर्वाधिक आंबट शौकीन

तिने जवळ जाऊन पाहिले असता, तो मोबाईल असल्याचे आढळले. यावेळी तरुणीने तत्काळ घर मालकिनीच्या कानावर ही बाब घालत पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पवई पोलिसांनी प्रदीप रॉय या माथेफिरूला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT