market price of onion continues to fall nashik news  
मुंबई

Onion News: तर कांदा आयात करावा लागू शकतो ; व्यापाऱ्यांनी वर्तवली भीती

Chinmay Jagtap

Onion News: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये पन्नाशी पार केलेला कांदा आता चाळिशीच्या घरात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना जरी थोडाफार दिलासा मिळाला असला, तरी यंदा राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती पाहता काद्यांची लागवड कमी होण्याची शक्यता असल्याने वेळप्रसंगी आयात करण्याची भीती एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

राज्यात सध्या नवीन कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात सध्या साठवणुकीतील जुना कांदा मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. आठवडाभरापासून एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये जुन्या आणि नवीन अशा दोन्ही कांद्याला चांगला भाव मिळाल्याने घाऊक बाजारात कांद्याने पन्नाशी पार केली होती.

तर किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता; मात्र वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणारा जुना कांदा सुमार दर्जाचा असल्याने या कांद्याला अधिक उठाव नसल्याने दरात घसरण झाली आहे.

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कांद्यासह नवीन शेतमालाच्या लागवडीला पाण्याअभावी अडचणी येणार आहेत. परिणामी, उत्पादन घटणार असल्याने एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात कांद्याची टंचाई निर्माण होऊन परदेशातून कांदा आयात करण्याची वेळ येऊ शकते.

- मनोहर तोतलानी, व्यापारी, कांदा-बटाटा बाजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT