Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024 sakal
मुंबई

Paduka Darshan Sohala 2024 : तेजस्वी अग्निहोत्रात नैराश्याची आहुती! ; श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव सोहळ्यात गुरूसेवकांच्या भावना

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वैश्विक उपासनेचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा तसेच सुख-समृद्धी समाधानाकडे घेऊन जाणारा सामूहिक अग्निहोत्र सूर्यास्तावेळी करण्यात आला. या अग्निहोत्रात जीवनातील नैराश्याची गुरुसेवकांनी आहुती दिली.

वाशीच्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव सोहळ्यानिमित्ताने सायंकाळी अग्निहोत्र करण्यात आले. यावेळी सुधीर लातूरकर यांनी अग्निहोत्र हा वैश्विक उपासनेचा मार्ग असून रोज सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी केल्याने यातून सुख, समृद्धी आणि समाधान मिळते. हवन कुंडात गाईच्या गोवऱ्या, कापूर, तूप याद्वारे अग्नी प्रज्वलित करून तांदूळ व तुपाची आहुती दिली जाते. तसेच अग्निहोत्र हे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपीठावरून दिली गेलेली एक उपासना असून मनात आंतरिक चैतन्य निर्माण झाल्याची भावना गुरुसेवकांनी व्यक्त केली.

प्रत्येकाने गुरूंचे विचार आत्मसात केले पाहिजेत. श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅममधून जगभरात या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी जर्मनी आणि युकेमध्ये हा प्रोग्रॅम लाँच केला जाईल. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषेतही फॅमिली गाईड प्रोग्रॅमची सुरुवात केली जाणार आहे.

-स्टेफिनी फाईट, चीफ क्युरेटर,

श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT