Paduka Darshan Sohala 2024 : सुखी जीवन जगण्याची ही वैचारिक क्रांती ; विश्व फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजिमवाले यांचे प्रतिपादन

आपण दु:खी आहोत, जीवन हे दुःखाचा सागर आहे, अशा कपोलकल्पित कल्पनांना मागे सारून जीवन हे आनंदाचे, सुखाचे, ऐश्वर्याचे एक जगण्याचे साधन आहे. या वैचारिक क्रांतीची सुरुवात आजच्या कार्यक्रमातून होणार आहे,
Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024 sakal

नवी मुंबई : आपण दु:खी आहोत, जीवन हे दुःखाचा सागर आहे, अशा कपोलकल्पित कल्पनांना मागे सारून जीवन हे आनंदाचे, सुखाचे, ऐश्वर्याचे एक जगण्याचे साधन आहे. या वैचारिक क्रांतीची सुरुवात आजच्या कार्यक्रमातून होणार आहे, असा विश्वास अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ व विश्व फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांनी व्यक्त केला.

सकाळ आयोजित श्री फॅमिली गाईड उपक्रमाअंतर्गत मंगळवारी (ता. २६) वाशी येथील श्री गुरूपादुका दर्शन उत्सवात डॉ. राजिमवाले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री एम सत्संग फाऊंडेशनचे प्रमुख पद्मभूषण श्री एम., सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार उपस्थित होते. डॉ. राजिमवाले यांनी आजचा कार्यक्रम एका नव्या सूर्योदयाची ही चाहूल आहे. एक सुवर्णकाळ उगवतोय आणि त्याचा एक प्रतीक म्हणून जणू आजचा हा कार्यक्रम आहे.

इतिहासामध्ये अनेक घटना घडत असतात. सहज इतिहासामध्ये वाईट घटनांची नोंद होते. मात्र, या कार्यक्रमाची आणि यातून झालेल्या सगळ्या परिश्रमाची नोंद इतिहास अवश्य घेईल. पहिल्यांदा इतिहासामध्ये सर्व संत महंत अवतार सद्‌गुरू यांच्या पादुका एका मंचावर उपस्थित आहेत. इतिहासामध्ये असे घडलेले नाही. श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा यांच्या तिघांच्याही पादुका मूळ अधिकारी मंचावर उपस्थित व्हाव्‍या, असे बहुतेक पहिल्यांदाच झाले आहे.

त्यामुळे ही उगवणाऱ्या नव्या युगाची ही चाहूल असे म्हणता येईल. या कार्यक्रमातून चांगले विचार प्रचलित व्हावे आणि हाच संदेश देण्यासाठी म्हणून सर्व सद्‌गुरू एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत. या सगळ्या सद्‌गुरूंचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या गावी जायची वेळ आली तर, काही शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. काही तास रांगेमध्ये उभे राहावे लागेल. त्याच्यानंतर लांबून कुठेतरी धर्मग्रहांमध्ये दर्शन घ्यावे लागेल; पण आज या कार्यक्रमांमध्ये काही फुटांवरून काही मिनिटांमध्ये दर्शन मिळत आहे.

Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024 : श्रीगुरू पादुकांची ई-बग्गीतून मिरवणूक

या सगळ्या संतांच्या या एकत्रित येण्यामागे इथून बाहेर पडताना एक नव व्यक्ती, वैचारिक क्रांती घेऊन बाहेर पडणार आहोत. या सर्व संतांच्या महंतांच्या ज्या शिकवणी आहेत. त्या आत्मसात करून घेऊन बाहेर जाणार आहोत. त्यांचे विचार त्यांचे शिकवण ही कायम आठवणीत राहावी, यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘श्री फॅमिली गाईड’ या उपक्रम महत्त्वाचा असल्याचे डॉ. राजिमवाले यांनी यावेळी सांगितले.

मुंबई ही अध्यात्मनगरी

मुंबई ही मायानगरी मानली जाते. मात्र, मुंबईतील या कार्यक्रमापासून बहुतेक मुंबई ही आध्यात्मिक नगरी होईल. या कार्यक्रमाची सुरुवात मुंबईतून व्हावी, ही जणू ईश्वराने निवड केली असल्याचे डॉ. राजिमवाले यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com