Palghar Crime sakal
मुंबई

Palghar Crime: कत्तलीसाठी जनावरांची स्कॉर्पिओ गाडीतुन वाहतुक, पोलीसांनी पाठलाग करून गाडी पकडली. 

उपशीर्षक: पोलिसांची सतर्कता; जनावरे वाहणारी संशयित स्कॉर्पिओ जेरबंद

सकाळ डिजिटल टीम

Palghar Crime: मोखाडा पोलिसांच्या नाकाबंदीत, संशयित स्कॉर्पिओ गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने बॅरॅकेटस ऊडवुन पळ काढला. पोलीसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून गाडी पकडली. या गाडीत सहा जनावरे कोंबुन, कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले आहे.

यावेळी गाडीतील एकाने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी सर्तकता दाखवत गाडीसह तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोखाडा पोलीसांच्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार, मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते यांनी ऑपरेशन ऑल आऊट आणि नाकाबंदी सुरू केली आहे.

मोखाड्यात गुरूवारी पहाटे  4  वाजता नाकाबंदी सुरू असताना, संशयित सफेद स्कॉर्पिओ गाडी पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने बॅरॅकेटस ऊडवुन तेथुन गाडी घेऊन सुसाट पळ काढला.  पोलीसांनी  4  किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून ही गाडी पकडली. या गाडीत सहा जनावरे कोंबुन भरल्याचे तसेच तीन ईसम आढळून आले आहे. ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत होती. 

             या कारवाई दरम्यान गाडीतील एकाने पोलीसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी शिताफीने मोहम्मद शेख, हुसेन शेख, आणि रझ्झाक शेख या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच वाहनासह सुमारे  4  लाख  35  हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ, हवालदार मोंढे आणि शिपाई बाळु भोये यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT