muder news  sakal
मुंबई

Palghar News: आठ दिवसात आढळले तीन मृतदेह; नाशिकच्या तरूणाला मोखाड्यात हत्या करून जाळले!

Palghar Crime: मोखाड्यात खूनाचे सत्र सुरूच : हत्या करून फेकून देण्याचे बनले ठिकाण

सकाळ वृत्तसेवा

Mokhada Crime : मोखाड्यात हत्या करून मृतदेह फेकून देण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शनिवारी 10 फेब्रुवारी ला रात्री साडेदहाच्या सुमारास मोखाड्यातील टाकपाडा जवळील जंगलात नदीकाठी एका तरूणाची हत्या करून अर्धवट जाळण्याची घटना घडली आहे.

यापूर्वी मध्यवैतरणा धरणाच्या पुल परिसरात हत्या केलेले दोन मृतदेह आढळले होते. एका आठवड्यात हत्या करून मृतदेह फेकून देण्याची ही तिसरी घटना मोखाड्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हत्या करून मृतदेह फेकून देण्याचे मोखाडा ठिकाण बनले आहे.

मोखाड्यातील मध्यवैतरणा धरणाच्या पुलावर 3 फेब्रुवारी ला अंगावर वार केलेला मृतदेह आढळला होता. त्यानंतर 7 फेब्रुवारी ला एका महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह याच पुलाच्या खाली आढळून आला आहे. या घटना ताज्या असतांना आणि पोलीसांचा तपास सुरु असताना, शनिवारी 10 फेब्रुवारी ला रात्री टाकपाडा जवळील जंगलात नदीकाठी एका तरूणाची हत्या करून अर्धवट जाळलेला मृतदेह आढळला आहे. त्यामुळे मोखाड्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मोखाडा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदरच्या मृतदेहाची ओळख पटलेली असुन मृत तरूणाचे संदेश काजळे असे नाव आहे. त्याचे अपहरण झाल्याची तक्रार नाशिक च्या पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे. सदरच्या तरुणाच्या अंगावर धारधार शस्रांनी वार केलेले असुन त्याचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला आहे. या घटनेची मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT