Palghar News: मध्यवैतरणा धरणावरील पुलं बनलाय खुन्यांना आंदण!

Dead bodies are being found regularly in this area. Blocking of vehicles on the bridge at night has happened. So this bridge is becoming a haven for criminals and murderers.परिसरात नियमित मृतदेह आढळून येत आहेत. रात्री अपरात्री पुलावर वाहने अडविण्याचे प्रकार ही घडले आहेत. त्यामुळे हा पुलं गुन्हेगार आणि खुण्यांसाठी आंदण ठरत आहे.
Madhyavaitrana dam
Madhyavaitrana dam sakal

मुंबई शहर आणि ऊपनगरांना पाणीपुरवठा करणारा महत्वाकांक्षी मध्यवैतरणा प्रकल्प मोखाड्यातील कोचाळा येथे सन  2012  मध्ये उभारण्यात आला आहे. या प्रकल्पावर रहदारी साठी मोखाडा- खोडाळा- विहीगांव या राज्यमार्गावर  भारतातील सर्वात उंच पुल बांधण्यात आला आहे.

त्यामूळे हा पुल आणि त्याखाली दुतर्फा पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे.परंतू या ठिकाणी पर्यटक, पादचारी आणि वाहणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना महापालिका अथवा शासनाने केलेली नाही. या परिसरात नियमित मृतदेह आढळून येत आहेत. रात्री अपरात्री पुलावर वाहने अडविण्याचे प्रकार ही घडले आहेत. त्यामुळे हा पुलं गुन्हेगार आणि खुण्यांसाठी आंदण ठरत आहे. 

Madhyavaitrana dam
Palghar Crime News: अमली पदार्थाच्या शोधासाठी शोधमोहीम जोरात

   मध्यवैतरणा परिसरात एका बाजूला दाट झाडी व खोल दरी आहे. मध्यवैतरणा प्रकल्पाच्या पाणी साठ्यावर मोखाडा- खोडाळा- विहीगांव या राज्यमार्गावर ऊंच पुलं बांधण्यात आला आहे. प्रकल्पाचा पाणी साठा आणि पुलं मुंबई  - आग्रा या राष्ट्रीय महामार्गापासुन अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे येथे नियमीत पर्यटकांची रेलचेल असते. सदरचा पुलं पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर आहे.

येथील भौगोलीक परिस्थितीचा फायदा घेवून मागील काही वर्षात शहरी भागातील गुन्हेगारी प्रवृत्ती ने मृतदेहांची विल्हेवाट लावणे, खुन करून पुरावे नष्ट करणे या गंभीर गुन्हे कामांसाठी परिसराचा वापर होत आहे. मध्यवैतरणा धरणावरील पुलाची लांबी  150  मिटर असून पुलाची उंची  70  मिटर आहे. पुलाच्या उंचीच्या दुप्पट खोल नदीपात्रातील खळीवर हा पुलं बांधण्यात आला आहे. त्यामुळे हा पुलं देशातील सर्वात ऊंच पुलं ठरला आहे. पुलाच्या एका बाजुला मोखाडा तर दुसर्या बाजूला शहापुर तालुक्यातील कसारा पोलिस ठाण्याची हद्द आहे.

               या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या पुलाच्या परिसरात खुन करणे, खुन करून पुरावे नष्ट करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्या घटनांची खबर मिळाली त्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. मात्र, खबर न मिळाल्याच्या तसेच पाणी साठ्यात खुनाचे पुरावे नष्ट केल्याच्या घटना मोठ्या संख्येने घडल्याचे या भागातील नागरीकांनी सांगितले आहे.

Madhyavaitrana dam
Palghar News: ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडकला लाल फितीत!

राष्ट्रीय महामार्गापासुन काही मिनिटांच्या अंतरावर हा परिसर असल्याने, अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणार्या नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. येथुन काही मिनिटांच्या अंतरावर मध्य रल्वेचे  कसारा आणि इगतपुरी रेल्वे स्थानक आहे. तसेच ऊत्तर महाराष्ट्रातील घोटी ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या मार्गावर नियमीत वाहनांची वर्दळ आहे. 

           या पुलावर  3  फेब्रुवारी ला मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा दुपारी  25  ते  30  वयोगटातील पुरूषाचा अंगावर वार केलेला मृतदेह आढळला होता. त्यापाठोपाठ चार दिवसाच्या अंतराने  7   फेब्रुवारी ला पुलाच्या खाली मुंडक छाटलेला  30  ते   35  वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनांमुळे मोखाडा तालुका हादरून गेला आहे. या घटनांसह रात्री अपरात्री प्रवास करणार्या, नागरीकांची वाहने अडवणे, दमदाटी करणे तसेच वाहनांचा पाठलाग करणे अशा घटना देखील घडल्या आहेत. या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने, पुर्वी रात्री घडणारे गुन्हे आता दिवसा ढवळ्या घडु लागले आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणार्या नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Madhyavaitrana dam
Palghar Crime: कत्तलीसाठी जनावरांची स्कॉर्पिओ गाडीतुन वाहतुक, पोलीसांनी पाठलाग करून गाडी पकडली. 

 मध्यवैतरणा पुलाच्या दुतर्फा सुरक्षा चौक्या उभारणे , सुचना फलक लावणे , रेडीयम लावणे , पथदिवे लावणे तसेच स्वयंचलीत कॅमेरे बसवणे या बाबी अत्यंत आवश्यक आहेत. त्याबाबत स्थानिक नागरीकांनी अनेक वेळा मागणी केली आहे. मात्र, सन  2012  साली या प्रकल्पाचे काम पुर्ण होवून  12  वर्षे ऊलटली आहेत. मात्र, या मागणीचा मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने गांभिर्याने विचार केलेला नाही तसेच कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. 

            मध्यवैतरणा धरणाच्या पुलावर तसेच परिसरात सातत्याने मृतदेह आढळत आहे. तसेच गुन्हेगारी देखील वाढत आहे. त्यामुळे पुलावर पथदिप बसवणे, सीसी टी व्ही कॅमेरे बसवणे आणि सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक आहे. पुलाच्या एका बाजुला कारेगांव ग्रामपंचायती च्या हद्दीत नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी ऊभारावी अशी लेखी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

मुरली कडु, सरपंच,

कारेगांव- कडुचीवाडी ग्रामपंचायत, ता. मोखाडा. 

Madhyavaitrana dam
Palghar Politics: पालघरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच; नक्की कोणाला मिळणार जागा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com