Mumbai Crime News 
मुंबई

Mumbai Crime News : महिलेचा तीन तुकडे केलेला मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

मुंबईच्या वडाळा परिसरात एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे

रोहित कणसे

मुंबईच्या वडाळा परिसरात ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचं वय साधारणपणे ३० ते ४० च्या दम्यान असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेचे तीन तुकडे करण्यात आले होते. त्यापैकी डोकं धड आणि एक पाय पोलिसांना सापडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील आमच्या गस्ती पथकाला एक संशयास्पद पिशवी सापडली होती, ज्यामध्ये एक जळालेला मृतदेह होता. आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, BPT (मुंबई पोर्ट ट्रस्ट) च्या ट्रॅक पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वडाळा परिसरात एक मृतदेह दिसला. त्यानंतर वडाळा पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासोबतच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची हत्या एक ते दोन दिवसांपूर्वी झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. महिलेचा मृतदेह एका पिशवीत होता.संशय आल्याने पिशवीची तपासणी केली असता तो अर्ध जळालेला मृतदेह आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT