LIVE PM Modi Mumbai Tour Sakal
मुंबई

PM Modi Mumbai Tour : मोदींच्या भाषणातील प्रमुख ११ मुद्दे

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदीं सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते 38 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ तसेच अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण आणि उद्घाटनानंतर मोदींनी बीकेसीत उपस्थित हजारो नागरिकांना संबोधित केले. या भाषणात नेमकं मोदी काय म्हणाले हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

  • बीकेसीती भाषणाची सुरूवात मोदींनी मराठीतून केली. त्यांच्या या खास सुरूवातीला उपस्थितांनी टाळा वाजवून दाद दिली.

  • मुंबई शहराला चांगलं बनवण्यात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज भारत मोठं स्वप्न पाहण्याचं आणि पूर्ण करण्याचं धाडस करतोय. भारताच्या मोठ्या संकल्पावर जगाचा विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.

  • एकनाथ शिंदेंनी दावोसमधला जो अनुभव व्यक्त केला. तसेच चित्र सगळीकडे दिसून येत आहे. भारताकडे आशेने पाहिलं जातंय असे ते म्हणाले.

  • मुंबईला भविष्यासाठी तयार करणं हे डबल इंजिन सरकारची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.

  • आगामी बीएमसीच्या निवडणुकीत भाजपचं सरकार आल्यास विकास अधिक वेगान होईल.

  • मुंबईचा विकास हवा असल्यास स्थानिक पातळीवर सत्ता हवी असे म्हणत त्यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.

  • यावेळी त्यांनी मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय स्वार्थासाठी अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले गेल्याचे मोदी म्हणाले.

  • शिंदे आणि फडणवीसांची जोडी सत्तेत येताच राज्यात पुन्हा वेगाने काम होऊ लागली आहेत.

  • डबल इंजिन सरकार सामान्य नागरिकालाही आधुनिक सुविधा देण्याचे काम करत आहे.

  • कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीसांचे अभिनंदन करतो असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT