PM Modi Visit to Mumbai : मुंबईकडं पैशांची कमी नाही, पण...; PM मोदींचा शिवसेनेवर निशाणा

भाजप आणि एनडीए सरकार कधीही विकास कामांच्या आड येत नाही असंही मोदी यावेळी म्हणाले.
PM Modi Visit to Mumbai : मुंबईकडं पैशांची कमी नाही, पण...; PM मोदींचा शिवसेनेवर निशाणा

मुंबईकरांसाठी तब्बल ३८,००० कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना संबोधित करताना शहराच्या विकासाचा मंत्र देखील सांगितला. मुंबईकडं पैशांची कमी नाही पण तो योग्य ठिकाणी वापरला जात नसल्याचं मोदी यावेळी म्हणाले. (not shortage of money for Mumbai PM Modi targets Shiv Sena on Visit to Mumbai)

PM Modi Visit to Mumbai : मुंबईकडं पैशांची कमी नाही, पण...; PM मोदींचा शिवसेनेवर निशाणा
PM Modi visit to Mumbai: पूर्वी आपण कसंबसं भागवत होतो, आज मोठी स्वप्न पाहतोय; मोदींनी व्यक्त केला विश्वास

मोदी म्हणाले, जेव्हा राज्यात विकासासाठी समर्पित सरकार असतं, जेव्हा शहरांमध्ये सुसाशनासाठी समर्पित शासन असतं. तेव्हाच हे काम वेगानं जमिनीवर येतं. त्यामुळं मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका मोठी आहे. मुंबईच्या विकासासाटी बजेटची कमी नाही. फक्त मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी लागायला हवा. जर तो भ्रष्टाचारात, बँकांच्या तिजोरीत बंद पडून राहिला, विकासाचं काम रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचं भविष्य उज्वल कसं असेल, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

PM Modi Visit to Mumbai : मुंबईकडं पैशांची कमी नाही, पण...; PM मोदींचा शिवसेनेवर निशाणा
Modi Visit to Mumbai: "माजू नका! अन्यथा आम्हाला माज उतरवता येतो"; कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं अरविंद सावंत संतापले

दरम्यान, मुंबईच्या सर्वसामान्य लोकांनी अडचणींचा सामना करत राहणं ही स्थिती २१व्या शतकातील भारताला कधीही शोभणारी नाही. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर कधीच नाही. मी मुंबईच्या लोकांच्या प्रत्येक अडचणीला समजून मोठ्या विश्वासानं सांगू इच्छितो की, भाजप आणि एनडीएच सरकर विकासाआड कधी येत नाही. पण आम्ही यापूर्वी मुंबईत असं होताना अनेकदा पाहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com