PM narendra Modi on Mumbai Visit modi on BMC election criticized mva govt Maharashtra Politics  
मुंबई

PM Modi Mumbai Visit : मोदींनी फुंकलं BMC निवडणुकांचं रणशिंग; विकासासाठी हवी स्थानिक पातळीवर सत्ता

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी शहरातील कोट्यावधीच्या विकासकामांची पायाभरणी केली. यादरम्यान मोदींची मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा देखील झाली. या सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी मागील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबईत विकासकामांच्या शुभारंभानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजप, एनडीएचं सरकार कधीही विकासाच्या आड येत नाही. राजकीय स्वार्थासाठी भाजप आणि एनडीए सरकार कधीही कुठल्या विकासाच्या आड येत नाही. पण मुंबईत वेळ वेळी असं होताना पाहीलं आहे.

पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले की स्वनिधी योजना याचं एक उदाहरण आहे. शहरातील अर्थव्यवस्थेचा भाग असलेले रेडीवाले आणि छोटे दुकानदार त्यांच्यासाठी योजना सुरु केली. या छोट्या व्यापाऱ्यांसाठी बँकाकडून स्वस्त आणि विना गॅरंटी कर्ज देण्यात आलं. ३५ लाखा व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला आहे. हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं.

दिल्ली ते मुंबई भाजपची सत्ता हवी

मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकत दिल्ली-महाराष्ट्र-मुंबई भाजपची सत्ता असायाल हवी असं सूचक विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं.

मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात डबल इंजिनचं (शिंदे-फडणवीस) सरकार नसल्याने प्रत्येक कामात अडचणी आणल्या गेल्या, ज्याचा फटका जनतेला बसला. असं पुन्हा होऊ नये म्हणून दिल्ली पासून महाराष्ट्र, मुंबई पर्यंत सर्वांचा हातभार चांगला समन्वय असलेली व्यवस्था निर्माण केली पाहीजे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मुंबईच्या विकासासाठी शहरात समर्पित प्रशासन असेल तर विकास वेगानं होतो, एकत्रित मिळून मुंबईचा विकास करु, असे मोदी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT