PM Modi Mumbai Visit : मुंबईवर २० वर्ष राज्य करणाऱ्यांनी स्वतःचे फिक्स्ड डिपॉझीट केले; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

BJP devendra Fadanvis slam shivsena bmc over mumbai stp project Maharashtra politics
BJP devendra Fadanvis slam shivsena bmc over mumbai stp project Maharashtra politics

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत, या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी मैदानात आज जंगी सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

आज पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईकरता एसटीपी (sewage treatment plant in mumbai) प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. रोज हजारो-करोडो लिटर पाणी कुठलीही प्रक्रिया न करता आपण समुद्रात सोडत होतो. समुद्राची घाण त्यामुळे होती.

फडणवीस पुढे म्हणाले, २०-२५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी फक्त स्वतःची फिक्स डिपॉझिट केले, स्वतःची घरे भरली. पण मुंबईकरांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला.

मुख्यमंत्री असताना मी एसटीपी तयार करायला सांगितलं होतं. पण एसटीपी (sewage treatment plants) कुठल्या नॉर्म्सने तयार करायचं तेच मनपाला माहिती नव्हतं. त्यानंतर मी याबद्दलची मागणी केंद्र सरकारकडे केली.

त्यानंतर एक वर्षात मोदी सरकारने हे दुषित पाणी डिस्चार्ज नॉर्म्स तयार करुन मुंबईमहापालिकेला दिले. परंतू त्यानंतर देखील तीन वर्षांपर्यंत मुंबई महापालिका हे काम करु शकली नाही. कारण इनका उनसे जम नही राहा था, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारचं आणि मनपाचं जमत नव्हतं कारण हिस्सेदारी मिळत नव्हती. म्हणून ते काम झालं नाही. आम्ही त्याला गती दिली. आज त्याचं भूमिपूजन होत आहे असे फडणवीस म्हणाले.

BJP devendra Fadanvis slam shivsena bmc over mumbai stp project Maharashtra politics
PM Modi Mumbai Visit : PM मोदींच्या लोकप्रियतेवर शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वास नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत 38,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील.यामध्ये सात एसटीपी प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे.

या प्रकल्पांना भेट देणार मोदी

  • 12,600 कोटी खर्च करण्यात आलीली मुंबई मेट्रो रेल्वे लाईन 2A आणि 7

  • पंतप्रधान नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डही लॉन्च करतील.

  • सात एसटीपी प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे.

  • भांडुप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सिद्धार्थ नगर हॉस्पिटल आणि ओशिवरा मॅटर्निटी होमच्या पुनर्विकासाची पायाभरणीही ते करणार आहेत.

  • मुंबईतील सुमारे 400 किमी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याच्या योजनेचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.

  • सीएसएमटीच्या 1,800 कोटी रुपयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही ते करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com