मुंबई

अखेर नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित..

सकाळ वृत्तसेवा

भारतातील अनेक मोठ्या घोटाळयांपैकी एक मोठा घोटाळा म्हणजे PNB घोटाळा. या संदर्भात विशेष PMLA कोर्टाने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय. हा निर्णय आहे या घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदी याबद्दलचा. PNB घोटाळ्याचा म्होरक्या नीरव मोदीला अखेर  कोर्टाने फरार म्हणून घोषित केलंय.  


पीएनबी बैक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यावसायिक नीरव मोदीला आज विशेष पीएमएलए न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले. याच घोटाळ्यातील अन्य आरोपी मेहुल चोक्सीला ही यापूर्वी फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले असून याविरोधात त्याने केलेली याचिका हायकोर्टाने बुधवार फेटाळली आहे. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यामुळे आरोपी ची सर्व मालमत्ता तपास यंत्रणा ताब्यात घेऊ शकते. पीएनबी गैरव्यवहार सुमारे 12000 कोटीहून अधिकचा आहे. 

PNB घोटाळा प्रकरणात ED कडून विशेष PMLA न्यायालयात नीरव मोदी विरोधात खटला सुरु आहे.  त्याप्रकरणी निरव मोदीला अनेकदा कोर्टात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलाय. मात्र कारवाईला निरव मोदी सामोरं जात नसल्याने त्याला  'परागंदा आर्थिक गुन्हेगार' घोषित करावे अशी विनंती सक्तवसुली संचालनालयानं (ED) ने केली होती. दरम्यान आता ED कडून आलेला अर्ज स्वीकारत नीरव मोदीला परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं गेलंय.  

Webtitle : PNB fraud case Nirav Modi declared as fugitive economic offender

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs BAN 2nd Test: बांगलादेशच्या ६४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक; Shoriful Islam च्या सहा बळींनी फिरली मॅच, पहिल्याच दिवशी १८ विकेट्स Video

Vishakha Raut: विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपद संकटात; शिवसेना ठाकरे गटाला धक्का

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोण करत आहे, हेही तरुणांना चांगले समजतय : विजय वडेट्टीवार

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’बाबत आमदारांनी भूमिका जाहीर करावी; आमदार जयंत पाटील यांचे आव्हान; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

Kaas Plateau Flower Festival : पर्यटकांसाठी खूशखबर! 1 सप्टेंबरपासून कास पठारावर फुलोत्सव; निसर्गाचा नवा अनुभव अन् आकर्षक पॉईंट्स सज्ज

SCROLL FOR NEXT