esakal | आता दहावी बारावीत कुणीच नापास होणार नाही, महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

आता दहावी बारावीत कुणीच नापास होणार नाही, महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय

आता दहावी बारावीत कुणीच नापास होणार नाही, महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहावी आणि बारावी म्हणजे आपल्या आयुष्यातील शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं वर्ष. वाढलेल्या स्पर्धेच्या युगात दहावी किंवा बारावीत अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नाहीत तर येणाऱ्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. अनेक विद्यार्थी त्या एका शेऱ्यामुळे अनेकदा कोणतं तरी चुकीचं पाऊल देखील उचलतात. मात्र आता विद्यार्थ्याचं मनोबल वाढवण्यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय.    


हेही वाचा गुलाबी थंडीची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची पावसाने सकाळीच लावली वाट
    

आता दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये कुणीच नापास होणार नाहीये. राज्य सरकारने त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने ‘कौशल्य सेतू कार्यक्रम’ योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत आता कुणाच्याही गुणपत्रिकेवर नापास किंवा अनुतीर्ण असा शेरा दिसणार नाहीये. 

काय आहे ‘कौशल्य सेतू कार्यक्रम’? 

  • राज्य सरकारने नापास विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘कौशल्य सेतू कार्यक्रम’ योजना सुरु केलीये. 
  • ज्या विध्यार्थ्यांना आता पास होण्याइतके मार्क मिळाले नाहीत, अशांच्या गुणपत्रिकेवर आता नापास किंवा अनुत्तीर्ण ऐवजी ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे. 

महत्व्वाची बातमीयेत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी होणार पाऊस

याआधीच खरतर हा निर्णय दहावीच्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आला होता. मात्र आता राज्य शिक्षण मंडाळाकडे सदर निर्णय बारावीसाठी लागू करण्याचे आदेश पाठवण्यात आलेत. याबाबतचा निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने जारी केलाय. 

WebTitle : now no will fill fail in SSC and HSC exams conduted by maharashtra state

loading image
go to top