Sameer Wankhede sakal media
मुंबई

समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल; बारच्या परवान्यासाठी खोटी कागदपत्रे ?

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Police complaint filed) करण्यात आला आहे. नवी मुंबई (Navi mumbai) येथे बारच्या परवान्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise department) ठाणे विभागाच्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने नवी मुंबई येथील समीर वानखेडे यांच्या रेस्ट्रॉ बारचा परवाना रद्द करण्यात आला होता. नवी मुंबईतील समीर वानखडे यांच्या रेस्ट्रॉ बारचे नाव सदगुरु आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ ला देण्यात आला होता. त्यावेळी वानखेडे हे सज्ञान नसल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश जानेवारीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले होते. या बारचा परवाना ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे.

यासाठी समीर वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच वयामध्ये विसंगती असल्याचे कारण देण्यात आले होते. ज्या वेळेस या बारचा परवाना देण्यात आला होता, त्यावेळेस ते सज्ञान नसल्यानेच हा परवाना रद्द करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात ही कारवाई करण्यात आली होती. आता याच सदगुरु बार आणि रेस्ट्रॉसाठी खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वानखेडे यांच्याविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनापासून राहुल गांधी दूर का? काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेत धक्कादायक दावा! पदोन्नती नाकारण्यासाठी लाखोंची डील? कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला! आणखी एका वारकरी महिलेचा मृत्यू, आकडा पोहोचला 4 वर

Kolhapur : वंशाच्या दिव्याचा हट्ट अन् विवाहितेचा अंत! कणकेतून गूळ खाल्ल्याने मुलगा होत नाही, हे सांगण्याची आली वेळ; गर्भवती महिलांमध्ये दिसणारं 'सायकॉसीस' काय आहे?

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

SCROLL FOR NEXT